Plastic Seized : प्लास्टिक विरोधी मोहीमेच्या पहिल्याच दिवशी ८७ दुकानदारांवर कारवाई, ८७ किलोचे प्लास्टिक जप्त

पथकाच्या समन्वयातून प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल वस्तूवर प्रभावीपणे कारवाई होण्यास मदत होणार आहे

270
Plastic Seized : प्लास्टिक विरोधी मोहीमेच्या पहिल्याच दिवशी ८७ दुकानदारांवर कारवाई, ८७ किलोचे प्लास्टिक जप्त
Plastic Seized : प्लास्टिक विरोधी मोहीमेच्या पहिल्याच दिवशी ८७ दुकानदारांवर कारवाई, ८७ किलोचे प्लास्टिक जप्त

पर्यावरण विभागाच्या सुचनेनुसार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस खात्यासोबत समन्वयाने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईत प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून कारवाईच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २१ ऑगस्ट २०२३ रोजी १ हजार १५९ दुकानांना भेटी दिल्या. त्यात ५९ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे ८७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

आता पर्यावरण विभागाच्या सुचनेप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस खात्यासोबत समन्वयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली असून यापुढच्या काळात देखील ती वेगाने सुरु राहणार आहे. त्यासाठी पथकं गठीत करण्यात आली आहेत. या पथकामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांसोबत महानगरपालिकेच्या विभागीय स्तरावरील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच कार्यवाही दरम्यान पोलीस दलातील एक कर्मचारीही समवेत समाविष्ट करण्यात येत आहे. या पथकाच्या समन्वयातून प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल वस्तूंवर प्रभावीपणे कारवाई होण्यास मदत होणार आहे.

New Project 2023 08 21T200753.720

प्लास्टिकचा पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेता, दिनांक १ जुलै २०२२ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना, अनुज्ञापन आणि बाजार खाते विभागाच्या पथकांनी संपूर्ण मुंबई महानगरात प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधातील कारवाईसाठी सुरूवात केली आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचना, २०१८ प्रकाशित केली आहे. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही अधिसूचना व सुधारणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. (https://www.mpcb.gov.in/waste-management/plastic-waste). या अधिसूचनेनुसार एकल वापराच्या म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिक वस्तू उत्पादन, वापर, वाहतूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री आणि साठवणूक यावर बंदी घालण्यात आलेली आहे. केंद्र शासनाने सिंगल यूज प्लास्टिक अधिसूचना २०२१ ही १२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८ आणि केंद्रीय शासनाची सिंगल यूज प्लास्टिक अधिसूचना २०२१ अंतर्गत खालील वस्तूंचे उत्पादन, उपयोग, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवण प्रतिबंधित आहेत.

New Project 2023 08 21T200943.647

(हेही वाचा – Navi Mumbai Traffic Department : केवळ दोन तासातच सीट बेल्ट न लावणाऱ्या ‘९०५’ जणांवर कारवाई)

या वस्तूंवर आहे बदली –
  • सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स)- हॅण्डल असलेल्या व नसलेल्या (सर्व जाडीच्या)
  • नॉन ओव्हन पॉलीप्रॉपीलीन बॅग्स (Non-woven polypropylene Bags) – ६० ग्रॅम प्रति चौरस मीटर (स्क्वेअर मीटर) (जीएसएम) पेक्षा कमी वजन असलेल्या प्लास्टिक डिश, बाउल, कॅन्टेनर (डबे), प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स) इत्यादी, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक भांडे व वाटी (कंटेनर व बाउल)
  • प्लास्टिक लेपित (Coating) तसेच प्लास्टिक थर (Laminated) असणाऱ्या पेपर/अॅल्युमिनियम इत्यादीपासून बनविलेल्या डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटे, वाडगा, कंटेनर इत्यादी.
सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकॉल – 
  • मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकिटे यांची प्लास्टिकची आवरणे.
  • प्लास्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या, आईस्क्रीम कांड्या, प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉन पेक्षा कमी)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.