Dr. Neelam Gorhe : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात वीर सावरकरांच्या प्रतिमेचे घेतले दर्शन

आपले हिंदुत्व हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व आहे आणि त्या हिंदुत्वाशी कायम कटिबद्ध रहा, असा उपदेश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दिला होता, अशी आठवण विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितली.

207

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रविवार, २१ जुलै रोजी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येऊन वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

स्मारकातील उपक्रम जाणून घेतले 

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष आणि स्मारकाचे विश्वस्त सुनील पवार उपस्थित होते. या प्रसंगी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  (Dr. Neelam Gorhe) यांनी स्मारकात सुरु असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती जाणून घेतली. त्यावेळी रणजित सावरकर यांनी ओम प्रतिष्ठानच्या वतीने हिंदूंच्या मंदिरांमध्ये अर्पण होणारे पूजा साहित्य आणि प्रसाद आदी  शुद्ध असावे, म्हणून विक्रेत्यांना ओम प्रमाणपत्र वितरित करण्याची चळवळ सुरु करण्यात आली आहे, त्याविषयीची माहिती दिली. त्यावर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातून ही चळवळ सुरु झाली, हे अभिमानास्पद आहे, असे म्हटले.

(हेही वाचा भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार शरद पवार; Amit Shah यांचा घणाघात)

शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या उपदेशाची आठवण 

‘हिंदुस्थान पोस्ट’च्या प्रतिनिधींशी बोलतांना डॉ. गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) म्हणाल्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आपल्या जीवनात गुरु म्हणून अनन्य साधारण महत्व आहे. आपले हिंदुत्व हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व आहे आणि त्या हिंदुत्वाशी कायम कटिबद्ध रहा, असा उपदेश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दिला होता, अशी आठवण डॉ. गोऱ्हे यांनी सांगितली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.