कामाठीपुरातील ‘त्या’ महिलांची अशीही दखल!

139

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान महिलांसह इतर सर्व महिलांचा गौरव महिला दिनी करण्यात आला आहे. मात्र, याच महिला दिनाचे औचित्य साधून शरीर विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या समाजातील उपेक्षित घटकांची दखल  महापालिकेच्यावतीने घेऊन त्यांच्यामध्ये स्वच्छतेबाबतची जनजागृती करण्यात आली. तसेच या महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. तसेच, लहान मुलांना खाऊचे वाटप करत, त्या सर्व महिलांसह मुलांचेही मनोरंजन करण्यात आले.

विशेष कार्यक्रमाचे आयोजन

kamati

मुंबई महापालिकेच्यावतीने समाजविकास अधिकारी मनोजकुमार शितूत यांनी खासगी संस्था आणि घनकचरा व्यवस्थापन यांच्या माध्यमातून कामाठीपुरा येथील १४व्या गल्लीत शरीर  विक्री करणाऱ्या महिलांकरता महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ८००  ते १००० महिलांना सॅनिटरी नॅपकीन्सचे वाटप करण्यात आले,  तर त्या वस्तीतील लहान मुलांना चॉकलेटसह खाऊचे वाटप करण्यात आले.

या मान्यवरांची उपस्थिती 

kamati 2

एडटेक कंपनीच्या संचालक निधी सरना, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहमुख्य कामगार अधिकारी स्वप्नील सुराडकर,  ई विभागाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक अभियंता अमित शेटे, ई विभागाच्या देखभाल व दुरुस्ती विभागाचे सहायक अभियंता जगताप, समाजविकास अधिकारी मनोजकुमार शितूत आदी उपस्थित होते.

( हेही वाचा :अशी पद्धत महाराष्ट्रात नव्हती, अजित पवारांचा सरकारला घरचा आहेर! )

स्वत:ची स्वच्छता राखा

kamati 1

यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे थिटे यांनी बच्चे मंडळींचे मनोरंजन केले. या प्रसंगात मनोजकुमार शितूत यांनी  नियोजन विभागाच्या माध्यमातून बचत गटांची स्थापना कशाप्रकारे करायची व त्यातून मिळणाऱ्या कर्जाची माहिती उपस्थित महिलांना दिली. तर घनकचरा विभागाच्या शिर्के यांनी महिलांना कशाप्रकारे स्वच्छता राखली गेली पाहिजे, या  संदर्भात जनजागृती केली, तर निधी सरना यांनी प्रत्येक महिलांनी स्वत:ची स्वच्छता कशी राखली गेली पाहिजे याची माहिती दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.