एक आधारकार्ड, अनेक मतदारअर्ज; Election Commission च्या फसवणुकीचा प्रयत्न फसला

90
आचारसंहितेत घेतलेले निर्णय प्रलंबित ठेवावे; Election Commission ने बजावलं
आचारसंहितेत घेतलेले निर्णय प्रलंबित ठेवावे; Election Commission ने बजावलं

बनावट आधारकार्डाच्या आधारे वोटर हेल्पलाईन या मोबाईल अ‍ॅपचा वापर करून मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या ४० जणांविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात २ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीचा वापर करून मतदार नोंदणीच्या संख्येत अचानक वाढ झाली. त्यानंतर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या या अर्जांची पडताळणी केली असता, त्यात अनेक अर्जदारांनी जोडलेल्या आधारकार्डचा नामांकन क्रम एकसारखाच आढळून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याचबरोबर आधारकार्डवरील फोटो देखील एकसारखेच असून त्यावरील व्यक्तींची नावे मात्र वेगवेगळी असल्याचे समोर आले. (Election Commission)

(हेही वाचा – Rajawadi Hospital च्या नवीन इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा, कंत्राटदाराची नेमणूक)

या प्रकारानंतर बनावट आधारकार्डाच्या आधारे वोटर हेल्पलाईन या मोबाईल अ‍ॅपचा वापर करून मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या ४० जणांविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर तहसीलदारांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून ही कारवाई करण्यात आली आहे. ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून निवडणूक आयोगाची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मतदार याद्यांची प्रक्रिया करणार्‍या केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी या बाबींची पडताळणी केली असता संबंधित व्यक्तींनी नमूद केलेल्या पत्त्यांवर संबंधित व्यक्ती आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याचा अर्ज नामंजूर करावा, अशी शिफारस साहाय्यक मतदार नोंदणी अधिकार्‍यांकडे पाठविली आहे. बनावट मतदार म्हणून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारत निवडणूक आयोगाची ४० जणांनी फसवणूक केली आहे. तोतयेगिरी करणार्‍या या ४० जणांचे नाव, पत्ता आणि ज्या मोबाईल क्रमांकाचा वापर ऑनलाईन नाव नोंदणीसाठी करण्यात आला होता, ते मोबाईल क्रमांकही तक्रारीसोबत जोडण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी अरविंद बोळंगे यांनी दिली आहे. (Election Commission)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.