मुंबई सुशोभीकरण अंतर्गत चेंबूर येथील अमरमहल पुलाखाली लाईटींगद्वारे सुशोभीकरण करण्यात येत असून यासाठी तब्बल १.४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे एका पुलाखाली विद्युत रोषणाई करता सुमारे दीड कोटींचा खर्च हा सर्वांच्या भुवया उंचवणारा आहे.
“मुंबईच्या सुशोभिकरण अंतर्गत विदयुत रोषणाई, रस्ते सुशोभिकरण, रस्त्यांचे पुर्नर्पष्टीकरण, रस्ते दुभाजक सुशोभिकरण, पदपथ सुधारणा व सुशोभिकरण, स्ट्रीट फर्निचर सुधारणा कामे आणि रोषणाई, पुलांचे सुशोभिकरण, रोषणाई व पुलाखालील जागेचा सुयोग्य वापर, आकाश मार्गिका (स्काय वॉक) रोषणाई, वाहतूक बेटांचे सुशोभिकरण, समुद्र किनारे व उद्यानांचे सुशोभिकरण व रोषणाई – समुद्र किनारे, समुद्र किनारे व उद्यानांचे सुशोभिकरण व रोषणाई- उघानाचे, डिजीटल जाहिरात फलक, किल्ल्यांची रोषणाई, गेट वे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभीकरण, मियावाकी वृक्ष लागवड, सार्वजनिक ठिकाणांची व पायाभूत सुविधा स्वच्छता, सुविधा शौचालय, भितींना रंगरंगोटी करणे इत्यादी बाबीचा समावेश आहे.
या अंतर्गत चेंबूर येथील अमरमहल पुलाखाली लाईटींगद्वारे सुशोभिकरण करण्यात येत. यासाठी मागवलेल्या निविदेत फलु ईड अँड पॉवर एटोमेशन एल एल पी ही कंपनी पात्र ठरली आहे. महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा ९ टक्के अधिक दराने बोली लावत हे काम मिळवले आहे. यासाठी १ कोटी ४० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community