मुंबईजवळील भिवंडी (Bhiwandi) शहरात पोलिसांनी एका बांगलादेशी घुसखोराला (Bangladeshi infiltrators) अटक केली आहे. शांतीनगर पोलिस ठाण्यात (Shantinagar Police Station) या बांगलादेशी घुसखोराची सखोल चौकशी सुरु आहे.
( हेही वाचा : Wankhede Stadium ला 50 वर्षे पूर्ण; स्टेडियम मागचा इतिहास काय ? वाचा सविस्तर …)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील (Bhiwandi) पिरानीपारा परिसरातील सुपर हॉटेलजवळ एका बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती शांती नगर पोलिस ठाण्याच्या (Shantinagar Police Station) पथकाला मिळाली. यानंतर पोलिसांनी दि. १८ जानेवारी रोजी पिराणी पाडा येथे छापा टाकला आणि अबुल मोहम्मद अन्वर हुसेन (Abul Mohammad Anwar Hussain) उर्फ बहादूर (२२) याला अटक केली. यानंतर पोलिसांनी अबुलला पोलिस ठाण्यात आणले आणि त्याची कागदपत्रे तपासली. त्याच्याकडून जप्त केलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी अबुल मोहम्मद अन्वर हुसेनला अटक केली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community