भारतातील हातमाग साडी संस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या (Union Ministry of Textiles) वतीने रविवार, १० डिसेंबर रोजी सकाळी मुंबई येथील एमएमआरडीए ग्राउंड, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), वांद्रे पूर्व, येथे ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ (One Bharat Sari Walkathon) चे यशस्वी आयोजन करण्यात आले. केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal), केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश (Darshana Jardosh) आणि खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी या वॉकेथॉनला ’हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
(हेही वाचा – Bhagwant Mann Allegations : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर मुलीचे गंभीर आरोप; ते दारू पितात आणि…)
‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला समर्थन – दर्शना जरदोश
महिलांनी त्यांची शक्ती दाखवण्याची ही वेळ आहे, हीच वेळ आहे आणि हीच ती योग्य वेळ आहे, असे सांगत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि जमलेल्या सर्व महिलांचे यात सहभागी झाल्याबद्दल आभार मानले.
अशा उपक्रमांच्या आयोजनामुळे ‘वोकल फॉर लोकल’ (vocal for local) या संकल्पनेला समर्थन मिळते. त्याचबरोबर महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवून आणि त्यांना निरोगी जीवन जगण्यास प्रवृत्त करण्यासाठी मदत मिळते, असे वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश (Darshana Jardosh) या वेळी म्हणाल्या.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ भावनेला समर्थन
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व आहे. जिथे स्त्रीत्वाची भावना स्त्रीच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये खोलवर रुजलेली आहे. विविध क्षेत्रातल्या महिलांचा, त्यांच्या विशिष्ट प्रादेशिक शैलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साड्या घालून इथे उपस्थित आहेत त्यातून , विविधतेचे सुंदर चित्र तयार झाले आहे आणि ते ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेला समर्थन देणारे आहे, असे जरदोश यांनी सांगितले.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : असा दिसतो मंदिराचा गाभारा; फोटो आला समोर)
हातमाग कारागिरीच्या चिरस्थायी वारशाला प्रोत्साहन – खासदार पूनम महाजन
आजच्या या उपक्रमाने केवळ मुंबईच्या चैतन्यपूर्ण अभिव्यक्तीला प्रतिध्वनित केले नाही, तर वॉकथॉनला साडीच्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक पैलूंने जोडले आहे, असे या वॉकथॉनच्या एक आयोजक खासदार पूनम महाजन यांनी सांगितले. आर्थिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक घटकांना एकत्रित आणून, ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ने एक प्रभावी चित्र निर्माण केले आहे, ज्यामधून भारताचे वैशिष्ट्य असलेल्या विविधतेतील एकता देखील साजरी केली जात आहे आणि त्याचबरोबर हातमाग कारागिरीच्या चिरस्थायी वारशाला प्रोत्साहन मिळाले आहे, असे त्या म्हणाल्या.
विविध क्षेत्रांतील 5000 महिलांचा सहभाग
सांस्कृतिक विविधता आणि सक्षमीकरणाच्या आजच्या उपक्रमात, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, सोनाली कुलकर्णी, रूपा गांगुली, गायिका फालगुनी पाठक डिझायनर अनिता डोंगरे, नीता लुल्ला, शायना एन सी यांच्यासह , दूरचित्रवाणीवरील तारका, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय महिला, उद्योग ,सामाजिक अशा विविध क क्षेत्रातील प्रभावशाली महिलासह 5000 हून अधिक महिला पारंपारिक हातमाग साड्यांबरोबर आधुनिक प्रकारच्या साड्या अभिनव पद्धतीने नेसुन या One Bharat Sari Walkathon मध्ये उत्साहात सहभागी झाल्या होत्या.
(हेही वाचा – Human Rights Day : १० डिसेंबर – मानव अधिकार दिन का साजरा केला जातो?)
यापूर्वी सुरतमध्ये आयोजन
भारतातील सर्वात मोठी ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ (One Bharat Sari Walkathon) ठरलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील हातमाग साडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच देशभरातील महिलांच्या साड्या परिधान करण्याच्या विशिष्ट पद्धतींचा परिचय इतरांना करून देणे, भारताची “विविधतेतील एकता असलेला देश’ ही प्रतिमा अधोरेखित करणे हा आहे. यापूर्वी सुरतमध्ये अशा साडी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
हातमाग क्षेत्राचा देशाला समृद्ध वारसा
हातमाग क्षेत्र हे आपल्या देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे, शिवाय मोठ्या संख्येने कारागिरांना, विशेष करून महिलांना रोजगार देणारे हे प्रमुख क्षेत्र आहे. भारतातील हातमाग क्षेत्रात 35 लाखांहून अधिक लोक गुंतलेले आहेत. हातमागावर साडी विणण्याच्या कलेशी पारंपारिक मूल्ये जोडलेली आहेत आणि प्रत्येक प्रदेशात वैशिष्ट्यपूर्ण साड्यांचे प्रकार प्रचलित आहेत.
पैठणी, कोटपाड, कोटा डोरिया, टंगाईल, पोचमपल्ली, कांचीपुरम, थिरुभुवनम, जामदानी, संतीपुरी, चंदेरी, माहेश्वरी, पटोला, मोइरांगफी, बनारसी ब्रोकेड, तनछोई, भागलपुरी सिल्क, बावन बुटी, पश्मिना साडी असे काही साड्यांचे प्रकार आहेत जे आपल्या कला, विणकाम, डिझाईन्स आणि पारंपारिक आकृतिबंधांसह जगभराला आकर्षित करतात. (One Bharat Sari Walkathon)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community