सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना, एक दिवसाच्या बाळाची चोरी

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. नर्स असल्याचे भासवत एका महिलेने चक्क एक दिवसांचं बाळ पळवलं आहे. याबाबत सांगली परिसरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही कॅमे-यात ही घटना कैद झाली आहे. आपल्या नवजात बाळाला डोळे भरुन पाहताही न आल्यामुळे बाळाच्या आईने टाहो फोडला आहे. दरम्यान या महिलेचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

सीसीटीव्ही कॅमे-यात घटना कैद

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे असलेल्या अंजली पाटील यांच्या दवाखान्यात रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. एक लाल साडी नेसलेल्या महिलेने सकाळी दवाखान्यात प्रवेश केला. त्यानंतर तिने नर्सचा वेश धारण केला. त्यानंतर या महिलेने प्रसूती झालेल्या महिलांच्या वॉर्डमध्ये प्रवेश केला. तिथून तिने एका बाळाला पिशवीत टाकत तिथून पळ काढला. या महिलेचे हे निंदनीय कृत्य सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालं आहे.

(हेही वाचाः Har Ghar Tiranga: आता दिवस-रात्र ‘तिरंगा’ फडकणार! ध्वज संहितेत मोठा बदल)

पोलिसांकडून शोध सुरू

ही घटना कळल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पोलिसांसमोर सर्व प्रकार उघड झाला आहे. या फूटेजच्या आधारे संबंधित महिलेचा शोध घेण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here