भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. शेतातील माल घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रकने साईड ने दिल्यामुळे थेट ३० फूट चुलबंदी नदीत कोसळला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी-लाखांदूर मार्गावरील शिव मंदिरा जवळ ही घटना घडली असून यामध्ये ट्रॅक्टरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील शिव मंदिरा जवळील पुलावरुन शेतातील कडधान्य बाजार समिती येथे घेऊन ट्रॅक्टर जात होता. त्यावेळेस समोरील येणाऱ्या ट्रकने साईड न दिल्याने ट्रॅक्टर थेट नदीत कोसळला. यामध्ये ट्रॅक्टरमधील एकाच जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. आण्णा पारधी (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव असून राष्ट्रपाल ठाकरे (वय ५०) आणि राध्येश्याम ढोरे (वय ४४) हे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
(हेही वाचा – अंधेरीत पुन्हा बेस्टच्या वातानुकूलित बसने पेट घेतला, पण प्रवाशी बचावले)