छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; एक ठार, तिघे जखमी

Motor-school bus accident in ratnagiri ,14 students survived
रत्नागिरीत मोटार आणि १४ विद्यार्थ्यांच्या स्कूल बसचा अपघात

सिल्लोड तालुक्यातील जळगाव-सिल्लोड रस्त्यावर धोत्रा फाट्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या पीकअपने मोटार सायकल स्वारास चिरडले. या अपघातात मोटार सायकल स्वार जागीच ठार झाला असून मयतची पत्नी व दोन्ही मुले असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव दिलीप उदयभान जाधव (वय ४२ वर्ष) असून रोहन दिलीप जाधव (मुलगा वय १५), चंद्रकला दिलीप जाधव (पत्नी वय ४० वर्ष) आणि गोपाल दिलीप जाधव (मुलगा वय १० वर्ष) अशी जखमींची नावे आहेत.

नेमकी घटना कशी घडली?

मोटारसायकलचा चालक हा उंडणगाव येथील एका नातेवाईकांचे लग्न आटोपून पत्नी आणि दोन्ही मुलां सोबत धोत्रा शिवना मार्गे बुलढाणाकडे जात होता. तर ऍपे रिक्षा (क्रमांक एम एच १७ बी वाय ८८४१) हा जळगावकडून नाशिककडे जात होता. धोत्रा फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच शेतकरी संघटनेचे मुक्ताराम गव्हाणे, संदीप गव्हाणे, गहिनीनाथ बँकेचे चेअरमन पिराजी मुराडे यांनी त्यांच्या वाहनातून जखमींना उपचारासाठी सिल्लोड येथे रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती अजिंठा पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भिंगारे, फौजदार राजू राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि अजिंठा पोलीस ठाण्यात अपघात दाखल केला.

अपघातात ठार झालेल्या इसमास सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर जखमींना सिल्लोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. त्यात रोहन जाधव हा गंभीर असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

(हेही वाचा – मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात; डिव्हाईडरचा राॅड कारच्या आरपार घुसला)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here