समृद्धी महामार्गावरील अपघात सत्र सुरुच; कारच्या भीषण अपघातात एक जागीच ठार, तर ३ जण जखमी

266

डिसेंबर २०२२मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघात सत्र काही थांबायचे नावच घेत नाहीये. सातत्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन अनेकांचा मृत्यू होत आहे. रविवारी, २२ जानेवारीला पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात (Samruddhi Highway Car Accident) झाल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

माहितीनुसार, अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्याच्या हद्दीत रविवारी सकाळी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार हा अपघात कार डीवाईडरला धडकल्याने झाला आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघात थांबवण्यासाठी उपाययोजना विचाराधीन आहेत. पण यादरम्यान अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकजण जागीच ठार झाला तर २१ जण जखमी झाले होते. ही बस नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जात होती. त्यावेळी बसचा अपघात झाला आणि बस समृद्धी महामार्गाच्या मध्यभागी पलटली. त्यामुळे अपघातग्रस्त झालेल्या बसमधून प्रवासी बाहेर पडत होते. तेवढ्याच मागून भरधाव वेगाने ट्रक आला आणि दोन प्रवाशांना चिरडून गेला. यामध्ये एका प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आणि दुसरा प्रवासी गंभीररित्या जखमी झाला. या बस अपघातामध्ये एकूण २१ प्रवाशी जखमी झाले होते.

(हेही वाचा – अमेरिकेने केला एअर स्ट्राईक! सोमालियात अल शबाबचे ३० दहशतवादी ठार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.