वांद्र्यात इमारतीचा भाग कोसळून १ ठार!

रविवारी, 6 जून रात्री 2 च्या सुमारास या 4 मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला.

88

मुंबईतील वांद्रे परिसरात एका इमारतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात बेहराम पाडा परिसरात चार मजली रझाक चाळ आहे. रविवारी, 6 जून रात्री 2 च्या सुमारास या 4 मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

रेस्क्यू ऑपरेशन सुरु

आमदार झिशान सिद्दीकी यांनीही ट्विट करत या घटनेची माहिती दिली. ही घटना वांद्रा पूर्वमधील आहे. मलब्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती असल्याने काही स्थानिकांच्या मदतीने मलबा बाजूला काढण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. सिद्दीकी यांनी सांगितले की मुंबई महापालिकेला मागील तीन तासांपासून याठिकाणी कामगार पाठवण्याची विनंती केली आहे, मात्र आतापर्यंत घटनास्थळी केवळ दोन कामगार दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने सध्या याठिकाणी काम सुरू आहे.

(हेही वाचा : राजकीय पक्षांना नाही कोरोनाचं सोयरसुतक!)

पावसाळ्याआधी इमारती पडू लागल्या!

दरम्यान पावसाळा सुरु होण्याआधीच इमारती पडू लागल्या तर पावसाळयात या घटना आणखी वाढतील. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी महापालिका धोकादायक इमारतींची यादी जाहीर करत असते, ती किती महत्वाची आहे, याचा प्रत्यय येतो. त्यामुळे पावसाळ्याआधी धोकादायक इमारती रिकाम्या करणे हे आव्हान बनले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.