मुंबईला लागून असलेल्या भिवंडीतील खाडीपार भागात शुक्रवारी पहाटे दुमजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे. माहितीनुसार, या दुर्घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास भिवंडीतील मूळचंद कॅम्पसमध्ये दुमजली इमारत कोसळली. जवळपास ३० ते ३५ वर्ष ही जुनी इमारत होती. दुर्घटनेत इमारतीचा पहिला मजला पूर्णपणे खाली कोसळला असल्यामुळे इमारतीखालील आठ दुकानं ढिगाऱ्याखाली गेली आहेत. याच आठ दुकानांपैकी एक कपड्याचं दुकानं होत. त्या दुकानात दुकानदार झोपला. याच दुकानदार माजिद अन्सारी (वय ३७)चा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाल्याची माहिती समोर येतं आहे.
सध्या या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजून कोणी अडकलंय का याचा अग्निशमन दलाकडून तपास केला जात आहे. दरम्यान धोकादायक इमारतींना नोटीस बजावली जाते, परंतु कारवाई केली जात नसल्यानं अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.
(हेही वाचा – दादरमधील रहिवासी इमारतीमध्ये लागलेली भीषण आग नियंत्रणात; मात्र राजकारण तापलं)
Join Our WhatsApp Community