मुंबईत ६० वर्षांच्या महिलेच्या शरीरात बीए व्हेरिएंट आढळला. रविवारी उपचारादरम्यान तब्बल ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा ६ वर दिसून आला. तर राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या आता ६४ वर गेली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८७ टक्क्यांवर
१६ जून रोजी या महिलेची कोरोना तपासणी सकारात्मक आढळली होती. महिलेला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवली. घरगुती विलगीकरणातच महिला पूर्णपणे बरी झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या सलग तिस-या दिवशी कमी होत असल्याचे रविवारी दिसून आले. त्यामुळे राज्यात आता केवळ २२ हजार ४८५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८७ टक्क्यांवर नोंदवले गेले आहे. रविवारी राज्यात २ हजार ९६२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर ३ हजार ९१८ कोरोनाबाधितांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. घरी सोडण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या नव्या रुग्णांच्या तुलनेत एक हजारांच्या संख्येने जास्त दिसून आली.
(हेही वाचा माळढोक पक्षापाठोपाठ तणमोर पक्षाच्याही अस्तित्वाला धोका)
- रविवारी मुंबईत ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ठाण्यात, पुण्यात तर गडचिरोलीत तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.
- राज्यातील मृत्यूदर – १.८७ टक्के
- राज्यातील रुग्ण कोरोनाबाधित दिसण्याचे प्रमाण – ९.७२ टक्के