नालासोपारा येथील बालकाचाही गोवरमुळे मृत्यू, मृतांची संख्या ११ वर

89

गोवर प्रतिबंधात्मक लसीपासून वंचित राहिलेल्या नालासोपारा पूर्व येथील एक वर्षाच्या बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाला. महिन्याभर ताप आणि खोकल्यावर त्रास होत असल्याने आठवड्याभरापूर्वीच बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. न्युमोनियावर उपचार घेत असतानाच खासगी रुग्णालयातून सार्वजनिक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बालकाच्या प्रकृतीस सुधारणा दिसून आली नाही. अखेरिस मंगळवारी बालकाचा मृत्यू झाला.

( हेही वाचा : नागपूरकरांना दिलासा; बांधकाम परवानगी शुल्कात १०० टक्के वाढीचा निर्णय रद्द )

नेमकी घटना काय

नालासोपारा येथील वर्षभराच्या मुलाला महिन्याभरापासून ताप आणि खोकल्याचा त्रास होता. १२ नोव्हेंबर रोजी शनिवारी बाळाच्या शरीरावर पुरळ दिसून आले. १३ मे रोजी बाळाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुस-या दिवशी बाळाला न्यूमोनियाचे निदान झाले. बाळाला तातडीने सार्वजनिक रुग्णालयात हलवण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना बालकाची चार दिवसांपूर्वी तब्येत खालावली. ऑक्सिजन पातळी कमी होऊ लागल्याने सोमवारी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र श्वसनात अडथळा येत गोवर आणि न्युमोनियामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचे पालिका आरोग्य विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

मंगळवारी निदान झालेले रुग्ण – १२

मस्जिद – २, धारावी – १, वरळी – १, जोगेश्वरी – १, कुर्ला – ३, गोवंडी – २, मालाड – १, गोरेगाव – १

एकूण गोवरबाधितांची संख्या – २२०

संशयित गोवरबाधित रुग्णांची संख्या – ३ हजार ३७८

गोवररुग्णांना उपचारासाठी उपलब्ध रुग्णालये –

  • कस्तुरबा रुग्णालय
  • शिवाजी नगर प्रसूतीगृह
  • भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली
  • राजावाडी रुग्णालय, घाटकोपर
  • शताब्दी रुग्णालय, गोवंडी
  • भाभा रुग्णालय, कुर्ला
  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, बोरिवली
  • सेव्हन हिल्स रुग्णालय, मरोळ

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.