नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (NEET) आणि जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (JEE) या दोन परीक्षा लवकरच कायमच्या बंद होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (UGC) पाठवण्यात आलेला प्रस्ताव मान्य झाल्यास नीट आणि जेईई मेन्स परीक्षा एकत्र विलीन होऊन देशात फक्त कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET) ही परीक्षा होऊ शकते.
( हेही वाचा : मुंबईच्या जैवविविधतेला मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख; ठाणे खाडी आता रामसर स्थळ )
नव्या प्रस्तावावर सध्या अभ्यास सुरू
आयोग या नव्या प्रस्तावावर काम करत असून एकाच विषयातील प्राविण्य सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सहभागी व्हावे लागते याला अर्थ नाही. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी मार्ग खुले होतील असे युजीसीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. सध्या मेडिकल आणि डेंटलचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावी लागते. तर इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी जेईई मेन्सची परीक्षा पास करावी लागते.
अभ्यासक्रमानुसार रॅंकिंग प्राधान्य
सीयुईटी या परीक्षेमध्ये सर्व विषयांचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना फक्त अभियांत्रिकीमध्ये जायचे आहे त्यांचे गणित, Physics, chemistry चे मार्क रॅंकिंगसाठी गृहित धरले जाऊ शकतात. वैद्यकीय अभ्याक्रमात सुद्धा प्राधान्य ठरवले जाईल.
Join Our WhatsApp Community