आता विद्यार्थ्यांनाही शाळेपासून ते महाविद्यालया पर्यंत एकच ओळखक्रमांक म्हणजेच विशेष आयडी देण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अंतर्गत, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्री-प्रायमरी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘ऑटोमेटेड परमनंट अकॅडेमीक अकाउंट रजिस्ट्री (APAAR)’ नावाचा ‘वन नेशन, वन स्टू़डंट आयडी’ देण्याच्या तयारीत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असलेल्या १२ अंकी आधार आयडीपेक्षा हे वेगळे असणार आहे. आता या विद्यार्थांना देखील लवकरच त्यांचा खास ओळख क्रमांक असलेली एक विशेष आयडी देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असेल. (One Nation One Student ID )
एपीएआर आयडी, एज्युकेशन इकोसिस्टम रजिस्ट्री किंवा एज्युलॉकर, हा आजीवन आयडी क्रमांक मानला जाईल आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आणि यशाचा मागोवा यामध्यामातून घेतला जाणार आहे.शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विद्यार्थ्यांसाठी आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. AICTE चे अध्यक्ष टीजी सीतारामन यांनी माहिती दिली आहे की आणि नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क हे संपूर्ण भारतातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्यूआप असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासादरम्यान शिकलेल्या प्रत्येक कौशल्याची त्यात नोंद केली जाईल.
(हेही वाचा Chandoli Sanctuary : चांदोली अभयारण्य आजपासून सुरू, नवी सुविधा ‘काय’ असणार? जाणून घ्या …)
डेटा सुरक्षिततेची हमी
सरकारकडून माहिती देण्यात आली आहे की, यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती आवश्यक असेल. सरकारने आश्वासन दिले आहे की डेटा गोपनीय राहील आणि तो फक्त सरकारी एजन्सींना शेअर केला जाईल.तो देखील आवश्यक असेल तेथेच शेअर केला जाईल. ज्या पालकांनी संमती दिली आहे ते कधीही ही परवानगी कधीही मागे घेऊ शकतात. संमतीनंतर तो सेंट्रल युनिफाइड डिस्ट्रिक्ट आणि इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी शाळेची असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community