मुंबईत उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये ‘वन रुपी क्लिनिक’च्या (One Rupee Clinic) माध्यमातून अवघ्या १ रुपयात वैद्यकीय उपचार करून देण्यात येतात. असे हे क्लिनिक मुंबईतील बहुतांश उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये उभारण्यात आले आहेत. आता हेच क्लिनिक उत्तर प्रदेशातही उभारण्यात येणार आहे.
Happy to announce, @1rupeeclinics got AYODHYA DHAM, VARANASI MAIN AND LUCKNOW JUNCTION railway stations..
It’s our proud to serve people of U.P.
Thank you all wellwishers and team one rupee clinic members.. @timesofindia @lokmat @ANILGALGALIRTI @LoksattaLive
— Dr Rahul Ghule (@DrRahulGhule11) January 10, 2024
मुंबईत उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये उभारण्यात आलेल्या वन रुपी क्लिनिकमध्ये (One Rupee Clinic) मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनतेला वैद्यकीय उपचार दिले जातात. स्वस्त दरात रक्ताच्या तपासण्या करून दिल्या जातात. आता हेच क्लिनिक उत्तर प्रदेशातही सुरु करण्यात आली आहे. अयोध्याधाम, वाराणसी आणि लखनऊ या रेल्वे स्थानकांमध्ये हे क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती वन रुपी क्लिनिकचे (One Rupee Clinic) संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी ट्विट द्वारे कळवले.
(हेही वाचा Uddhav Thackeray : ही तर मॅच फिक्सिंग; हा निकाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान; उद्धव ठाकरेंची टीका)
Join Our WhatsApp Community