कांदा निर्यातीवर केंद्र सरकारकडून इतिहासात प्रथमच ४० टक्के निर्यात शुल्क लादले या कळीच्या मुद्द्यावर व्यापाऱ्यांनी यापूर्वी २० ते २३ ऑगस्ट दरम्यान लिलाव (Onion Auction) बंद ठेवले होते. त्यानंतर चर्चा होऊन गेलं पुन्हा सुरू झाले. मात्र मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाली व्यापाऱ्यांनी पुन्हा बुधवारपासून बाजार समितीने यांच्या कांदा लिलावावर सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल जिल्ह्यातील पंधरा बाजार समिती बाजार आभाळात होणारी दैनंदिन दीड लाख क्विंटल सरासरी आवक झालेली नाही. परिणामी जवळपास दैनंदिन तीस कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे कांदा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
कांदा लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. सणासुदीच्या काळात लिलाव बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे पणन आयुक्त आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना सत्तारांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचा :India vs Canada : भारताचा महत्वाचा निर्णय; कॅनडाच्या नागरिकांना आता भारतात ‘नो एंट्री’!)
गणेशोत्सव सुरू असल्याने मंगळवारी प्रमुख बाजार समितीमध्ये कांदा लिलाव झालेले नाहीत त्यामुळे अप्रत्यक्षपणे गेल्या दोन दिवसापासून कांदा लिलावात ब्रेक लागला आहे. बाजार समितीमध्ये कांदा खरेदी करणाऱ्या व्यापारांनी लिलावात सहभागी होणार असल्याचे कळविले आहे.
मात्र पर्याय व्यवस्था नाही त्यामुळे अशा परिस्थितीत फक्त शेतकरी भरडला जात असल्याचे चित्र आहे. व्यापारांनी बाजार आवरत प्रत्यक्ष सहभागी होण्याचे कळवले असले तरीही व्यापारी खेळांवरून कांदा देशावर पाठवण्याचे काम सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी कळवले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community