कांदा, कापूस, सोयाबीन दराचा प्रश्न अखेर मार्गी लागणार; Piyush Goyal यांची पाशा पटेल यांना ग्वाही

170
कांदा, कापूस, सोयाबीन दराचा प्रश्न अखेर मार्गी लागणार; Piyush Goyal यांची पाशा पटेल यांना ग्वाही

कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढ-उतारामुळे व्यथित झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि पर्यावरण संतुलन टास्क फोर्स अध्यक्ष पाशा पटेल यांच्या भेटीत दिले आहे. २०२१ ते २०२४ या काळादरम्यान महाराष्ट्रामध्ये कापूस सोयाबीन आणि कांदा या पिकांच्या बाजारभावामध्ये चढ-उतार झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. (Piyush Goyal)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्याशी राज्यातील विविध प्रश्नांवर पाशा पटेल यांच्या बैठकीचे नियोजन केले होते. पाशा पटेल यांनी कापूस सोयाबीन आणि कांदा या पिकांसंदर्भात निर्माण झालेल्या अडचणी आकडेवारीनिशी पीयूष गोयल यांची भेट घेऊन विस्तृतपणे मांडल्या. यावेळी मंत्री गोयल यांना पर्यावरण संतुलित इको-फ्रेंडली बांबू पासून निर्मित श्री गणेशाची मूर्ती देखील भेट दिली. (Piyush Goyal)

(हेही वाचा – Irfan-Yusuf Exchange : धावचीत झाल्यावर इरफान आणि युसुफ या पठाण बंधूंमध्ये मैदानातच रंगली खडाजंगी)

शेतकऱ्यांच्या संबंधित शेतमालाचे आयात निर्यात धोरण आणि आयात शुल्क याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी तातडीने बैठक करून या विषयांवर ठोस निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या बैठकीमध्ये स्पष्ट केले. आगामी काळात महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या सगळ्या शेती प्रश्नांची सोडून करणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या पंधरा दिवसात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत केंद्रीय वाणिज्य मंत्री यांची उच्चस्तरीय बैठक देखील आयोजित केली जाणार आहे. “महाराष्ट्रातील या शेती प्रश्नांवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी एक तास बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असून लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे, राज्य कृषी मूल्य आयोग आणि टास्क फोर्सचे चे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्पष्ट केले आहे.” (Piyush Goyal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.