Onion Export Banned :कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आक्रमक; लिलाव बंद

केंद्र सरकारने कांदा बंदी केल्यानंतर शेतकरी आणि व्यापारी या दोघांमध्ये उद्रेक बघायला मिळत आहे.

253
Onion Export Banned :कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आक्रमक; लिलाव बंद
Onion Export Banned :कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आक्रमक; लिलाव बंद

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने आता राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आले असून त्यामुळे शेतकरी प्रचंड संतप्त झाले असल्याचे पाहावयास मिळत आहे. बीड, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात याचे सर्वाधिक परिणाम जाणवत आहेत. अनेक ठिकाणी कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कांदा प्रश्न पुन्हा एकदा चिघळणार आहे. (Onion Export Banned )

केंद्र सरकारने कांदा बंदी केल्यानंतर शेतकरी आणि व्यापारी या दोघांमध्ये उद्रेक बघायला मिळत आहे. नाशिक मध्ये ही परिस्थिति पाहावयास मिळत आहे. यंदा राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातून  उरल्या सुरल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. (Onion Export Banned )

(हेही वाचा : OBC Reservation : ओबीसी आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन नाही – कपिल पाटील)

मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. अहमदनगर मध्ये कांद्याचा लिलाव सुरू झाला होता. मात्र केंद्राच्या या घोषणेनंतर तो बंद झाला. याचाच परिणाम म्हणजे तेथील कांद्याच्या किंमती १८ ते २० रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.