Onion Prices : कांद्याच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारी गोदामांत अतिरिक्त कांदा साठवण्याचा सरकारचा निर्णय

आगामी सणासुदीच्या दिवसांत कांदा किरकोळ विक्रीसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

179
Onion Prices : कांद्याच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारी गोदामांत अतिरिक्त कांदा साठवण्याचा सरकारचा निर्णय
Onion Prices : कांद्याच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारी गोदामांत अतिरिक्त कांदा साठवण्याचा सरकारचा निर्णय
  • ऋजुता लुकतुके

अनियमित पावसामुळे यंदा शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण होऊन एखाद्या शेती उत्पादनाची किंमत झपकन वर जाते, असं या हंगामात आधी बटाटा मग टोमॅटोच्या बाबतीत झालं होतं. आता कांद्याच्या बाबतीत तसं होऊ नये म्हणून सरकार काय करतंय बघूया… (Onion Prices)

आगामी सणासुदीच्या दिवसांत कांदा किरकोळ विक्रीसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या किमती वाढायला लागल्यावर सरकारने सरकारी गोदामातील कांद्याची साठवणूक ३ लाख टनांवरून थेट ५ लाख टनांवर नेली आहे. या अतिरिक्त साठवलेल्या कांद्याचा वापर सरकार किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करणार आहे. सध्या ५ लाख टन कांदा सरकारी गोदामांमध्ये आहे. हे प्रमाणही लवकरात लवकर ५ लाख टनांवर नेण्याचं सरकारचं उद्दिष्टं आहे. २०२२-२३ च्या हंगामात भारताने फक्त २.५ लाख टन कांदा साठवला होता. (Onion Prices)

(हेही वाचा – Hike In Onion Price : डिसेंबर पर्यंत कांद्याचे दर राहणार चढेच)

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने यापूर्वीच साठवलेल्या कांद्यापैकी १.७ लाख टन कांदा बाजारपेठांमध्ये आणला आहे. १६ राज्यांमध्ये घाऊक विक्रेत्यांना या कांद्याचं वितरण करण्यात आलं. हेतू कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवणं हाच होता. दिवाळीच्या दिवसांमध्ये अन्नधान्यं आणि भाज्यांच्या किमती वाढतात. पण, यंदा कांदा निदान ५० रुपये प्रती किलो राहील याची खबरदारी घेण्याचं सरकारने ठरवलंय. सध्या किरकोळ विक्रीसाठी असलेला कांदा ४० रुपये प्रतीकिलो दराने मिळतोय. गेल्याच आठवड्यात ही किंमत ३३ रुपये इतकी होती. (Onion Prices)

हे दर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दिवाळीच्या सुमारास आणखी १.७४ लाख टन कांदा सरकारी गोदामातून खुला करण्यात येणार आहे. देशात कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पण, या दोन्ही ठिकाणी अनियमित पाऊस झाल्याने यंदा कांद्याचं खरीप पीक रखडलं आहे. लाल कांदा अजून पुरेशा प्रमाणात बाजारपेठांमध्ये आलेला नाही. एकदा तो यायला लागला की कांद्याचे दर नैसर्गिक रित्या आटोक्यात येतील असा अंदाज आहे. खासकरून ईशान्य भारतीय राज्यांमध्ये कांद्याचे भाव चढे आहेत. (Onion Prices)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.