लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या १५ दिवसांत कांद्याच्या घाऊक भावात सुमारे ६०% वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्यात त्याची किंमत १८% वाढली आहे. बुधवारी देशाची राजधानी दिल्लीत कांद्याच्या किरकोळ किमतीत २५-५०% वाढ झाली आहे. या बाजारात कांदा ५० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे. तर डिसेंबर पर्यंत हे कांद्याचे दर चढेच राहणार असल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे. (Hike In Onion Price)
यंदा पाऊस लांबल्याने पहिली लागवड वाया गेली. तर दुसऱ्यांदा केलेली लागवड पाण्याखाली गेली. त्यानंतर नवीन लागवड करायला दोन महिने उशीर झाला. परिणामी यावेळी दिवाळीच्या तोंडावर येणारा कांदा आता दोन महिने उशिरा येणार आहे. सध्या बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. नवरात्री नंतर कांद्याची मागणी वाढली. मात्र उत्तम दर्ज्जाचा केवळ २०% कांदा बाजारात आहे.
(हेही वाचा : Central Railway Block : मध्य रेल्वेचा दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक)
ही वाढ डिसेंबरपर्यंत सुरू राहील
सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर काहीसे स्थिर असले तरी मागील आठवडाभरात कांद्याने मात्र ‘पन्नाशी’ गाठली. राज्यासह लगतच्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा उत्पादकांनी कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी आणला नाही. काही दिवसांपूर्वी मसाल्याच्या साहित्यासह लिंबू, टोमॅटो या भाज्यांच्या दरांनी उच्चांक गाठला होता. टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. (Hike In Onion Price)
हेही पहा –