नुकताच अकरावी ऑनलाईन (Online Admission) प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्र जाहीर झाले आहे. यंदा २ जून रोजी दहावीचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे. यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. ९५.८७% मुली पास झाल्या आहेत तर ९२.०५% मुले पास झाली आहेत. मुली आणि मुलांच्या सामायिक यशात ३.८२% चा फरक आहे.
(हेही वाचा – Monsoon : महाराष्ट्रात मान्सून येणार पण कधी? यासाठी ही बातमी वाचा…)
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाचा (Online Admission) निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्र जाहीर झाले आहे. ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेला 8 जूनपासून सुरूवात होणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होत आहे. याआधी अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरला होता.आता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग दोन भरायचा आहे.
8 जून रोजी विद्यार्थ्यांना (Online Admission) अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी महाविद्यालयाचे पसंती क्रमांक भरता येणार आहेत. तर 19 जूनला अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
हेही पहा –
असे आहे अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक
– 8 ते 12 जून रात्री 10 वाजेपर्यंत -नियमित पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे
– प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे म्हणजे नियमित फेरी-1 साठी पसंती अर्ज भाग-2 ऑनलाईन सादर करणे.
– विद्यार्थ्यांना भाग-2 मध्ये किमान एक व कमाल 10 पसंतीक्रम नोंदविता येतील.
– (विद्यार्थ्यांना डेटा प्रोसेसिंगनंतर भाग-2 मध्ये दिलेल्या त्यांच्या पसंतीनुसार प्रवेशासाठी महाविद्यालय मिळेल / अलॉटमेंट केले जाईल) विद्यार्थ्यांनी विहित मुदतीपूर्वी त्यांचा फॉर्म भाग-2 लॉक करावा
– 12 जून -प्रवेश अर्ज भाग एक भरणे,मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करणे
– 13 जून -तात्पुरती पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणे
– 13 ते 15 जून – विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये चुका असल्यास दुरुस्ती संदर्भात गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविणे
– 15 जून अंतीम गुणवत्ता यादी तयार करणे
– 19 जून सकाळी 10 वाजता- पहिला गुणवत्ता यादी जाहीर
– विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यालय निवड यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे.
– विद्यार्थी लॉगीनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविणे.
– संबंधित विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्याथ्यांची यादी कॉलेज लॉगीन मध्ये दर्शविणे
– फेरीचे कट-ऑफ पोर्टलवर दर्शविणे. (विद्यार्थ्यांना संक्षिप्त संदेश / SMS देणे)
– 19 ते 22जून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे
– 23 जून दूसर्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे