उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २१ मे, २०२४ रोजी ऑनलाईन जाहीर झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट, २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेतंर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संसथेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रिडेट घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. (12th Supplementary Exam)
इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर स्वीकारण्यास २७ मे २०२४ पासून प्रारंभ होणार असून नियमित शुल्कासह ७ जूनपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. विलंब शुल्कासह ८ जून, २०२४ ते १२ जून, २०२४ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. उच्च माध्यमिक शाळांनी, कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची मुदत ३१ मे, २०२४ ते १५ जून, २०२४ पर्यंत आहे. तसेच उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यास याद्या जमा करण्याची तारीख १८ जून २०२४ पर्यंत राहील. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट, २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे अर्ज त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच भरावेत. (12th Supplementary Exam)
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च, २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यंना, त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या फेब्रुवारी-मार्च, २०२५ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्याच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळामार्फत कळविण्यात आले आहे. (12th Supplementary Exam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community