आता बुकिंगची नाटकं बंद : महापालिकेच्या नाट्यगृहात प्रयोगांचे ऑनलाइन बुकिंग

मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहांच्या तारखांच्या आरक्षण बुकिंगमध्ये होत असलेल्या सावळा गोंधळाला लगाम घालून तारखांच्या बुकिंग कारभारामध्ये सुसुत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता ऑनलाइन बुकिंग प्रणालीचा अवलंब करण्याचा विचार महापालिकेच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : TET Scam : वेतन बंद केलेल्या शिक्षकांना अंतरिम दिलासा; औरंगाबाद खंडपीठाने दिले ‘हे’ निर्देश)

मुंबईत सध्या महापालिकेचे गिरगाव चौपाटी जवळील ‘राजा डॉ. बलदेवदास बिर्ला क्रीडा केंद्र’ अंतर्गत असणारे ६२५ आसनी प्रेक्षागृह हे बंद झाले आहे, विलेपार्ले पूर्व परिसरातील ९१६ आसन क्षमतेचे ‘दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह’, बोरिवली परिसरातील १०२६ आसन क्षमतेचे ‘प्रबोधनकार केशव सितारात ठाकरे नाट्यमंदिर संकुल’, मालाड पूर्व परिसरातील सुमारे १५०० आसन क्षमतेचे ‘स्वरसम्राट कुंदनलाल सेहगल’ खुले नाट्यगृह व मुलुंड पश्चिम परिसरातील सुमारे १५०० आसनक्षमतेचे ‘कालिदास नाट्यगृह’ यांचा समावेश आहे. ही नाट्यगृहे असून यामध्ये नाट्य प्रयोगाच्या तारखा आरक्षित करण्यासाठी यापूर्वी काही ठराविक निर्माता मंडळी बुकिंग करून त्याठिकाणी आपली मक्तेदारी निर्माण करत असल्याचा तक्रारी मागील काही महिन्यांपासून येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने नाट्य प्रयोगाच्या तारखा आरक्षित करण्याबाबत ऑनलाइन बुकिंग प्रणालीचा अवलंब करण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळत आहे.

ऑनलाइन आरक्षण बुकिंग प्रणालीचा अवलंब

विलेपार्ले येथील दीनानाथ, मुलुंड येथील कालिदास आणि बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे या तीन नाट्यगृहात प्रामुख्याने मराठी नाटकांचे प्रयोग होतात. परंतु सर्वच नाट्य निर्मात्यांना प्रयोगाकरता तारखा मिळत नसून यापुढे ऑनलाइन आरक्षण बुकिंग प्रणालीचा अवलंब केल्यास प्रत्येकाला याचा लाभ घेता येईल, तसेच प्रत्येक प्रयोगाच्या तारखा रेकॉर्डवर येतील. विशेष म्हणजे नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांना मर्जीतील नाट्य निर्मात्यांना तथा आयोजकांना तारखा देता येणार नाही. मनुष्य हस्तक्षेप टाळून ऑनलाइन बुकींग प्रणालीमुळे यामध्ये पारदर्शकता येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. येत्या १५ दिवसांमध्ये ऑनलाइन बुकिंग प्रणालीचा अवलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एक प्रतिक्रिया

  1. असा ऑनलाईन थेटर बुकिंग चां निर्णय अत्यंत योग्य ठरेल. त्यामुळे तारखा व शो चां काळाबाजार बंद होईल. सध्या काही जण वाटून थेटर बुक करून ठेवतात मग बिचारे छोटे कार्यक्रम संयोजकांना ह्यांचे पाय धरावे लागतात.
    ऑनलाईन बुकींग करताना कार्यक्रमाचे नावासह बुकिंग व्हावे आणि त्याचे साठी वेटींग लिस्ट सुद्धा तयार करावी रेल्वे प्रमाणे RAC पद्धती. म्हणजे आपोआप क्रमवार थेटर मिळेल. नेहमी स्वतःचा कार्यक्रम रद्द करून दुसऱ्यांना बुकिंग विकणारे गेल्या किमान तीन वर्षातील रेकॉर्ड बघून तेव्हढ्या संस्थांना सरळ सरळ ह्या ऑनलाइन बुकिंग मधून तीन वर्षे बाद करावे. हाच प्रकार शासनाने सर्व राज्यभर शासकीय नाट्यगृहे, हॉल ह्यांना लावावा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here