कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणाचे सोलापूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या नेत्रांवर झालेले परिणाम तपासण्यासाठी विशेष नेत्र तपासणी मोहीम जिल्ह्यात राबवली गेली. या तपासणीमध्ये 836 विद्यार्थ्यांना चष्मा लागल्याचे दिसून आले. या शिवाय अंगणवाडीतील काही बालकांमध्ये तिरळेपणाचा दोष आढळला.
सर्वाधिक वेळ मोबाईलवर घालवला
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण दिले गेले. त्यामुळे मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. मुलांनी अधिक वेळ मोबाईल पाहण्यात घालवला. तसेच, ऑनलाईन शिक्षणाच्या निमीत्ताने मुलांनी मोबाईलवर गेम खेळले, यू-ट्यूब पाहिले. सोलापूर जिल्ह्यात एकूण 52 पथकांकडून ही मोहीम राबवण्यात आली. प्रत्येक पथकात दोन वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेचा सहभाग होता.
( हेही वाचा: 38 वर्षांपूर्वी त्या तुफान रात्रीने घेतले होते 11 हजार लोकांचे जीव )
मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
- राज्यात नेत्र तपासणी मोहीम राबवणारा सोलापूर हा पहिलाच जिल्हा
- विशेष मोहिमेबदद्ल मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्याचे कौतुक करण्यात आले.
- एकूण 52 पथकांमार्फत प्राथमिक तपासणी
- दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांची 24 नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी.
Join Our WhatsApp Community