नाताळ आणि इंग्रजी नववर्ष स्वागतासाठी पर्यटनस्थळी जाण्याचा ट्रेन्ड गेल्या किमान दहा ते पंधरावर्षांपासून वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापूर, सातारा, सांगली आदि जिल्ह्यातून येणार्या पर्यटकांचे प्रमाण मोठे आहे. पंढरपूरमध्येही भाविकांची गर्दी वाढली आहे. परिणामी येत्या २ जानेवारीपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचे ऑनलाइन दर्शन बुकिंग (Online Darshan Booking ) बंद केले आहे.
हेही वाचा-Bangladeshi infiltrators: राज्यात अवैध घुसखोरीविरोधात कारवाई सुरू; एटीएसने 16 बांगलादेशींना अटक केली
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Shri Vitthal Rukmini Temple) समितीच्या https://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर श्रींच्या दर्शनासाठी अगोदरच ऑनलाइन बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. एक दिवस अगोदर दर्शनासाठी आपल्या सोयीच्या वेळेत ऑनलाइन बुकिंग करण्याची मोफत सोय उपलब्ध केलेली आहे. दिवसभरात पाच ते सहा हजार भाविकांना ऑनलाइन दर्शन बुकिंगवरून दर्शन वेळ निर्धारणाची व्यवस्था मागील आठ वर्षांपासून बुकिंग सुरू आहे. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रेच्या काळात केवळ ही सुविधा भाविकांची संख्या जास्त असल्याने बंद ठेवण्यात येत असते. (Online Darshan Booking )
हेही वाचा-राज्यातील हवाई दळणवळण वाढविण्यासाठी विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या – CM Devendra Fadnavis
यंदा गेल्या आठ – दहा दिवसांत मार्गशीर्ष महिना, नाताळ सणाच्या आणि शनिवार, रविवारच्या सलग सुट्ट्या तसेच १ जानेवारी रोजी नवीन वर्षारंभ असल्याने पंढरीत भाविकांची गर्दी वाढलेली आहे. दर्शनरांगेत १० ते १५ हजार भाविक उभे असतात. त्यामुळे दर्शनरांगेतील भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता मंदिर समितीने ऑनलाइन दर्शन बुकिंग २ जाने २०२५ पर्यंत बंद ठेवले आहे. त्यामुळे ऑनलाइन बुकिंग दर्शनाचा मुख्य दर्शनरांगेवरील ताण कमी झाला असून भाविकांना दर्शन कमी वेळात मिळणे सोयीचे झाले आहे. (Online Darshan Booking )
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री (Manoj Shrotri) म्हणाले की, मार्गशीर्ष महिनाअखेर चालू आहे, शिवाय सलग सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. दर्शनरांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीने ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था २ जानेवारीपर्यंत बंद ठेवली आहे. त्यानंतर ती पूर्ववत सुरू होणार आहे. (Online Darshan Booking )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community