येत्या २१ जुलैपर्यंत ऑनलाईन विवाह नोंदणी बंद, ऑफलाईन सुरु!

गणकीय प्रणाली पूर्ववत होईपर्यंत महापालिकेच्या सर्व २४ विभागांमधील विवाह निबंधकाकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.

88

संगणकीय प्रणालीचे अद्ययावतीकरण व सक्षमीकरण गरजेचे असल्याने महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे सध्या याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. या अद्ययावतीकरणाच्या अंमलबजावणीकरीता संबंधीत संगणकीय प्रणालीचे कामकाज २१ जुलै २०२१ पर्यंत बंद राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या काही सेवा-सुविधांविषयीची कार्यवाही अल्प कालावधीसाठी ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने होणारे विवाह नोंदणीचे कामकाजही बंद राहणार असून यामुळे पर्यायी स्वरुपात विवाह नोंदणी विषयक कार्यवाही ही ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली आहे.

(हेही वाचा : मुख्यमंत्री-पवार यांच्यात पुन्हा एकदा भेट! कोणत्या विषयांवर झाली चर्चा?)

सर्व २४ विभागांमधील विवाह निबंधकाकडे थेट अर्ज स्वीकारले जातील!

संगणकीय प्रणाली पूर्ववत होईपर्यंत महापालिकेच्या सर्व २४ विभागांमधील विवाह निबंधकाकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील आणि मुलाखतीची तारीख व वेळ देण्यात येईल. विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधीत संगणकीय प्रणालीच्या अद्ययावतीकरणाचे काम झाल्यानंतर प्रचलित पद्धतीने ऑनलाईन अर्ज केल्यावर प्राप्त होईल. याबाबत अधिक माहितीसाठी विभागातील विवाह निबंधकाकडे संपर्क साधावा आणि महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे, असेही आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.