पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन (ola-uber-swiggy-zomato) कंपनी यासारख्या मोबाईल अॅपद्वारे काम (mobile app services) (Online Services) करणारे कामगार बुधवार, २५ ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा बंद पाळणार आहेत. कंपन्यांकडून होणारी कामागारांची पिळवणूक थांबावी, यासाठी बंद पाळण्यात येणार आहे. या बंदचे आयोजन इंडियन गिग वर्कर्स फ्रंट या संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातसुद्धा गिग कामगार नोंदणी आणि कल्याणकारी कायदा लागू करावा, या मागणीसाठी हा बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमुळे ओला, उबेरच्या माध्यमातून चालणाऱ्या कार, टू व्हीलरवरून होणारा स्विगी आणि झोमॅटोची डिलिव्हरी पुण्यात बंद राहणार आहे.
(हेही पहा – Election Candidate : तिकिटासाठी नेत्यांची पळापळ; पक्षाने तिकीट दिले नाही तर लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश)
फूड डिलिव्हरी बॉयना सध्या भेडसावणाऱ्या प्रमुख मागण्या म्हणजे फोनवर दाखवलेले अंतर आणि प्रत्यक्ष अंतर यामध्ये कोणताही फरक नसावा, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी, ऑर्डरचे दर सर्वांसाठी सारखेच असावेत, सध्याच्या दरात किमान ५० टक्क्यांनी वाढ करावी, दररोज किमान वेतन मिळण्याची सोय असावी याशिवाय आयडी ब्लॉक करणे किंवा कोणत्याही डिलिव्हरी बॉयवर दंड ठोठावण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यापूर्वी ग्राहकाच्या तक्रारीची पडताळणी केली पाहिजे, खोटी कारणे देऊन आयडी ब्लॉक करू नये, अशा काही समस्या फूड डिलिव्हरी बॉयना भेडसावत असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.
बंद पाळणारे सर्व कर्मचारी त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले निवेदन सादर करणार आहेत. निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना ते आपल्या मागण्या सादर करणार आहेत आणि मागण्या पूर्ण करण्याची विनंतीही करणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community