Nashik जिल्ह्यात पर्यटनाला जाण्यासाठी ऑनलाईन पास घ्यावा लागणार, जिल्हा प्रशासनाने केलं ‘या’ सूचनांचे पालन करण्याचं आवाहन

778
Nashik जिल्ह्यात पर्यटनाला जाण्यासाठी ऑनलाईन पास घ्यावा लागणार, जिल्हा प्रशासनाने केलं 'या' सूचनांचे पालन करण्याचं आवाहन

पावसाळा भटकंती करण्यासाठी जेवढा उत्तम तेवढाच तो अपघातांच्या दृष्टीकोनातून वाईट. यामुळे पावसाळी पर्यटनादरम्यान होणारे संभाव्य अपघात (Accident)टाळण्यासाठी नाशिक (Nashik) जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. गर्दी होणाऱ्या पर्यटन स्थळावर (Tourist spot) जाण्यासाठी पर्यटकांना ऑनलाईन परवानगी (online permission) घ्यावी लागणार आहे.

गड किल्ले, धबधबे, धरण परिसरात खबरदारी घेण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत. वन आणि पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पर्यटन स्थळांची अ, ब, क अशी वर्गवारी करून उपाययोजना करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत तसेच पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत.

(हेही वाचा – T20 World Cup, Rohit Sharma : इंग्लंड विरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्मा ड्रेसिंग रुममध्ये भावूक झाला ‘तो’ क्षण )

जिल्ह्याधिकाऱ्यांचे पर्यटकांना आवाहन
पर्यटन स्थळ ज्या विभागाच्या अंतर्गत असेल त्या विभागाकडून पर्यटकांना ऑनलाईन पास घ्यावे लागणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी या तत्त्वावर पर्यटनस्थळी जाण्यास परवानगी देऊन गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. धोकादायक ठिकाणी सेल्फी, फोटो काढू नये तसेच रिल्स बनवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पर्यटकांना केलं आहे.

काय काळजी घ्याल?
– पावसाळ्यात होणारे बहुतेक अपघात अतिआत्मविश्वास, परिसराची नसलेली माहिती या गोष्टींमुळे होतात. पावसाळ्यात कुठल्याही सहलीला किंवा ट्रेकला जाताना त्या ठिकाणाची, तेथे जाणाऱ्या विविध वाटांची पूर्ण माहिती करून घेणे.

– जर त्या ठिकाणी पहिल्यांदाच जाणार असाल, पाऊस पडत असेल, दाट धुके आणि वादळी वाऱ्यात गावातील एखादा मार्गदर्शक घेणे कधीही चांगले. पण बऱ्याच वेळा एखाद्या ठिकाणाची माहिती मित्रांकडून किंवा नेटवरून घेतलेली असते. त्या माहितीच्या आधारे पर्यटक त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्या ठिकाणाची योग्य माहिती नसल्यामुळे वाट चुकतात, क्वचित प्रसंगी आपला जीव पण गमावून बसतात. असे प्रसंग घडू नयेत, याकरिता पर्यटक ज्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणार आहेत तेथील धोक्यांची माहिती घ्यावी, तेथे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

भटकंती करताना…
– पावसात भटकंती करा, पण भटकंती करत असताना स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्या.
– भटकंती करताना संयम ठेवा. भटकंती करताना मला सर्व माहिती आहे, हा अतिउत्साह दाखवू नका. विशेषतः पाण्याच्या ठिकाणी फिरताना काळजी घ्या.
-निसर्गाचा मान राखा. पर्यटन करताना काळजी घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.