Mahila Bachat Gat : महिला बचत गटांच्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री

3773
Mahila Bachat Gat : महिला बचत गटांच्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री

मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी महिलांनी तयार केलेली उत्पादने पारंपरिक पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याकरता महानगरपालिकेने विविध व्यासपीठ खुले करून दिले आहेत. आता यात ऑनलाईन विक्रीचाही पर्याय खुला करून देण्यात आला आहे. महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने आता https://shgeshop.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नवनवीन उत्पादनांची यात दररोज भर पडत आहे. यातून अधिकाधिक महिलांना रोजगार मिळत आहे. (Mahila Bachat Gat)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचा नियोजन विभाग महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतो. महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेले मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरांत तब्बल आठ हजारांपेक्षा अधिक बचत गटत आहेत. या प्रत्येकी एका बचत गटात दहा महिला सदस्य आहेत. या सर्व महिलांना त्यांचे घरकाम सांभाळून कुटुंबासाठी हातभार लावता यावा यासाठी महानगरपालिकेने विविध वस्तू, उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच त्यांना अर्थसहाय्य देखील केले आहे. (Mahila Bachat Gat)

मुंबई महानगरातील आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना रोजगार मिळावा, महिला बचतगटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यातून महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी नियोजन विभागाकडून महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांत महिला बचत गटांतील सदस्य महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना आतापर्यंत विविध प्रदर्शने, व्यापारी संकूल, यात्रा, उत्सवांमध्ये विक्री करण्याची संधी मिळवून दिली आहे. यासमवेत विविध दुकानांच्या माध्यमातूनही या महिलांनी आपली उत्पादने ग्राहकांना पुरविली आहेत. या महिलांनी साकारलेल्या वस्तू आणि विविध उत्पादनांना आता ऑनलाईन विक्रीची कवाडेही खुली झाली आहेत. (Mahila Bachat Gat)

(हेही वाचा – लोकशाही, संविधानाला असलेला धोका संपला नाही; Aditya Thackeray यांचा भाजपावर निशाणा)

बचत गटांतील महिलांना प्रशिक्षण

होतकरू मराठी मुलांनी नव उद्योगाच्या (स्टार्ट अप) माध्यमातून https://shgeshop.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर विविध ग्राहक उपयोगी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांतील महिलांना याच मुलांच्या माध्यमातून ऑननाईन ऑर्डर कशी स्वीकारावी, त्यानंतर ग्राहकांना संबंधित वस्तू कशी विकावी, ऑननाईन व्यवहार कसा करावा, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. (Mahila Bachat Gat)

पहिल्या टप्प्यात ५० बचत गटांची निवड

ऑनलाईन व्यवसायासाठी महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने बचत गटांची वर्गवारी केली आहे. त्यानुसार ज्या बचत गटांची उत्पादने (खाद्यपदार्थ वगळून) ही टिकावू असतील, अशा बचत गटांना ऑनलाईन विक्रीसाठी पुढे केले आहे. पुढील टप्प्यांत साधारण महिनाभर टिकू शकतील, असे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या बचत गटांनाही ऑनलाईन विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली. (Mahila Bachat Gat)

ही उत्पादने मिळताहेत ऑनलाईन

बचत गटांनी तयार केलेले उटणे, अगरबत्ती, जुट बॅग्ज, इमिटेशन ज्वेलरी, मोत्याचे दागिने, साड्या, रांगोळी, परफ्यूम, ड्रेस, लेडीज कुर्तीज्, फॅन्सी कँडल्स, विविध प्रकारचे आकर्षक तोरण, दिवाळीसाठी कंदील, आकर्षक पणत्या, बांबूच्या आकर्षक वस्तू तसेच सजावटीचे आकर्षक साहित्य आदी सध्या ऑनलाईन उपलब्ध आहे. (Mahila Bachat Gat)

बचत गटांमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी पुढे यावे. या माध्यमातून मिळणारा फिरता निधी, व्यवसायासाठी कर्ज, अनुदान, व्यवसायासाठी प्रशिक्षण आदींचा लाभ घ्यावा. याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या महानगरपालिका विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा विभाग कार्यालयातील समाज विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी केले आहे. (Mahila Bachat Gat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.