Water Storage: पुण्यातील धरणांमध्ये फक्त ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक

193
Water Storage: पुण्यातील धरणांमध्ये फक्त ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक
Water Storage: पुण्यातील धरणांमध्ये फक्त ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक

यंदाच्या पावसाळ्यात पाऊस (Water Storage) कमी झाल्याने, गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत सध्याचा पाणीसाठा ६०.३० टीएमसीने कमी आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मंगळवार, ११ डिसेंबरपर्यंत फक्त १३३.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण ९७.५१ टक्के होते. त्यामुळे यंदाचा आज अखेरचा उपलब्ध पाणीसाठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०.४० टक्क्यांनी कमी झाला आहे तसेच २६ धरणांव्यतिरिक्त टाटा समुहाच्या ६ धरणांमधील पाणी साठा वेगळा आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ३२ धऱणे आहेत. यापैकी ६ धरणे टाटा समुहाची आहेत. टाटा समुहाची धरणे वगळता उर्वरित २६ धरणे आहेत.

(हेही वाचा – PM Narendra Modi करणार कृत्रिम बुद्धिमत्ता जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषदेचे उद्घाटन )

‘खडकवासला’त २४ टिएमसी पाणी
पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील ४ धरणांमध्ये मिळून आज अखेरपर्यंत २४.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

‘उजनी’त फक्त १३.२५ टीएमसी साठा
उजनी धरणात सध्या फक्त १३.२५ टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

‘टाटां’च्या धरणातील पाणीसाठा…
पुण्यात टाटा उद्योग समुहाची ६ धरणे आहेत. या धरणांमध्ये मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली यांचा समावेश आहे. या ६ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही ४२.७६टीएमसी इतकी आहे. यापैकी सध्या ३९.९० टीएमसी (८१.६१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.