मुंबईत ९ हजार कोविड रुग्ण : दिवसभरात नवे ६४८ रुग्ण!

मुंबईतील एकूण कोविडबाधित रुग्णांची संख्या ४,४६७ ने शुक्रवारी करण्यात आल्यानंतर शनिवारी आणखी १,३७७ एवढी रुग्णसंख्या कमी झाली आहे.

109

मुंबईत कोरोना रुग्ण संख्या साडेआठशे झाली होती, आता रुग्णवाढीचा पारा खालच्या दिशेला सरकू लागला आहे. शनिवारी दिवसभरात ६४८ नवीन रुग्ण आढळून आले असून दिवसभरातील मृतांचा आकडा हा १५ एवढा आहे. तर दिवसभरात १,९१९ रुग्ण बरे होवून घरी परतले. मात्र, आतापर्यंत मुंबईतील विविध भागांमध्ये ९ हजार १४८ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. मागील काही दिवसांपासून सक्रीय रुग्णांचा आकडा १४ हजारांवर अडकला होता. परंतु आता या उपचार घेत असलेल्या रुग्णांची आकडेवारी कमी होवून सध्या ९ हजारांवर आली आहे.

शनिवारी ३३ हजार ७५९ चाचण्या करण्यात आल्या!  

शुक्रवारी दिवसभरात ६९३ रुग्ण आढळून आले होते, तिथे शनिवारी दिवसभरात ६४८ रुग्ण आढळून आले आहेत. तर शुक्रवारी दिवसभरात जिथे २० रुग्णांचा मृत्यू झाला होता,  तिथे शनिवारी १५ रुग्णांची नोंद झाली आहे तर शुक्रवारी जिथे जिथे ३० हजार ८९८ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या ६९३ एवढी होती, तर शनिवारी ३३ हजार ७५९ चाचण्या करण्यात आल्यानंतर ६४८ रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात १९१९ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर शनिवारपर्यंत ९ हजार १४८ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. तर दिवसभरात १५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यामध्ये १२ मृत रुग्ण हे दिर्घकालीन आजाराचे होते. तर मृतांमध्ये ०७पुरुष आणि ०८ महिला रुग्णांचा समावेश होता.  या मृत रुग्णांपैंकी २ रुग्ण हे ४० वर्षांखालील वयोगटातील होते, तर १० रुग्ण हे ६० वर्षांवरील होते आणि उर्वरीत ०३ मृत रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.

(हेही वाचा : मुंबईची एकूण रुग्णसंख्या घटली: ८ हजार रुग्ण बाहेरचे!)

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ७२३ दिवसांवर आला!   

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९६ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ७२३ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ८८इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या १४ एवढी आहे.

मुंबईतील आणखी १,३७७ रुग्ण संख्या घटली

मुंबईतील एकूण कोविडबाधित रुग्णांची संख्या ४,४६७ ने शुक्रवारी करण्यात आल्यानंतर शनिवारी आणखी १,३७७ एवढी रुग्ण संख्या कमी झाली आहे. हे सर्व रुग्ण मुंबई बाहेरील असून त्यांची नोंद मुंबईतील एकूण रुग्णसंख्येत दर्शवली होती. परंतु रुग्णांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर हे रुग्ण मुंबई बाहेरील वेगवेगळ्या जिल्ह्यातील असल्याचे आढळून आले. त्यामुळे या रुग्णांची नोंद तेथील जिल्ह्यांमधील एकूण रुग्णांच्या नोंदीमध्ये करून मुंबईतील एकूण रुग्णसंख्येतून वजा करण्यात आली आहे.

(हेही वाचा : अखेर महापालिकेने स्पुटनिक लस खरेदीचा प्रस्ताव गुंडाळला!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.