सायन रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद

154

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईतील सायन येथील पालिकेच्या टिळक रुग्णालयात मंगळवारी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात आला. जुन्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. सकाळपासूनच बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या केवळ ८ नव्या रुग्णांना केसपेपर दिला गेला. त्यानंतर केसपेपर देणं बंद केले. रुग्णांना नवे केसपेपर मिळणार नाहीत, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. केईएम, नायर आणि कुपर रुग्णालयात रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नाही. सोमवारपासून रुग्णच कमी येत असल्याने अद्याप रुग्णसेवा हाताळण्यात ताण आलेला नाही, अशी माहिती दिली गेली.

( हेही वाचा : लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० जागा जिंकणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा)

मंगळवारी सकाळपासून सेंट्रल मार्ड आणि पालिका मार्ड या निवासी डॉक्टरांची वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाकडून बैठक सुरु आहे. दिवसभराच्या चर्चेनंतर सायंकाळी उशिरापर्यंत बैठक सुरु असल्याने संप दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. केईएम रुग्णालयाने एरव्हीपेक्षा जास्त शस्त्रक्रिया मंगळवारी झाल्या असा दावा केला.

काय घडले

केईएम रुग्णालय — सायन रुग्णालय — नायर रुग्णालय — कूपर रुग्णालय

बाह्यरुग्ण विभाग २९० — २५८ — १४९ — ३४
दाखल रुग्णांची संख्या १०९ — ९३ — ५९ — १२
बाह्य रुग्ण विभागांतील नवे रुग्ण १ हजार ६९८ — ८ — १ हजार ९७ — ६४२
जुन्या रुग्णांच्या फॉलोअपची संख्या – २ हजार १७७ — ३८१ — १ हजार २९४ — ८६९
प्रसूती ९ — १ — ४ – १
मृत्यूची संख्या ६ — ९ — ३ -०
शवविच्छेदन ५ — १ — ० – ०
मोठ्या शस्त्रक्रिया ६५ — २० — २० –१५
छोट्या शस्त्रक्रिया ७६ — ७ — ३ – ४

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.