Electricity Theft : दादरमध्ये खुलेआम वीज चोरी, बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलाय का फेरीवाल्यांना मोफत वीज वापराचा परवाना?

1049
Electricity Theft : दादरमध्ये खुलेआम वीज चोरी, बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलाय का फेरीवाल्यांना मोफत वीज वापराचा परवाना?

बेस्ट उपक्रम आधी तोट्यात असून महापालिकेच्यावतीने आर्थिक करून बेस्टचा कार्यभार सुस्थितीत राखण्याचा प्रयत्न केला जात असला तरी प्रत्यक्षात बेस्टला मात्र स्वत: नफ्यात येण्यासाठी कोण्त्याही प्रकारचा प्रयत्न करताना दिसत नाही. बेस्टच्या विद्युत विभागाच्यावतीने होणारी चोरी ही गंभीर समस्या असून यावर मात करण्यात बेस्टला अद्यापही यश येत नसून यामुळे उपक्रमाचे कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. दादर पश्चिम येथील केशवसुत उड्डाणपुलावरील तसेच खालील बाजुस असलेल्या रस्ते दिव्यांच्या जोडणीतून फेरीवाल्यांकडून विजेची चोरी केली जाते. या पुलाखालील ९ ते १० गाळ्यांमध्ये ही विजेची चोरी (Electricity Theft) होत असून प्रत्येक फेरीवाले हॅलोजनसह मोठ्या वॅटचे बल्ब आणि पंख्याचा वापर सर्रास तिथे करत आहेत. (Electricity Theft)

New Project 2024 06 19T140544.438

दादर पश्चिम रेल्वे स्थानकाशेजारी सेनापती बापट मार्गावरुन जाणाऱ्या केशवसुत उड्डाणपुलाच्या खाली तब्बल २० गाळे असून चप्पल विक्रेत्यांसह घनकचरा व्यवस्थापन विभागाची चौकी वगळता अन्य सर्व गाळ्यांमध्ये गाळ्यांमध्ये फेरीवाल्यांनी अतिक्रमण करत जागा अडवल्या आहेत. या गाळ्यांमध्ये फेरीवाल्यांकडून व्यवसाय केला जात असून रात्रीच्या वेळी दिव्यांची व्यवस्था प्रत्येक फेरीवाल्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी असते. मात्र, रात्रीच्या वेळी चोरीची लाईट घेऊन विजेचा प्रकाश पाडणाऱ्या फेरीवाल्यांकडून आता दिवसाही मोठ्या मेगावॅट क्षमतेचे बल्ब तसेच हॅलोजन आणि पंख्याचा वापर केला जात आहे. (Electricity Theft)

New Project 2024 06 19T140154.456

(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs Afg : भारत, अफगाणिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर….)

कामत हॉटेल समोरील गाळ्यामध्ये एकाबाजुला फुलांचा कचरा गोळा केला जातो, पण त्याच गाळ्यात फुल विक्रेत्यांकडून बोर्ड लावून त्याद्वारे हॅलोजनचा वापर केला जातो. त्या शेजारील गाळ्यांमध्येही दोन्ही बाजुला मोठ्या बल्बचा वापर केला जातो आणि त्या शेजारील गाळ्यांमध्ये प्रत्येक कपडे आणि चप्पल विक्रेत्यांकडूनही मोठ्या दिव्यांचा वापर केला जातो. याच गाळ्यांमध्ये फुल विक्रेत्यांकडून पंख्याचा वापर केला जात असून या तिन्ही गाळ्यांमध्ये बेस्टच्या वतीने बसवण्यात आलेल्या मोठ्या स्ट्रीट लाईटच्या जोडणीतून यासर्वांनी दिव्यांची व्यवस्था केली आहे. त्यानंतर चप्पल विभागाकरता महापालिकेने स्वत: गाळे आणि विजेची व्यवस्था करून दिली असली तरी दरबार हॉटेलसमोरील दोन्ही गाळ्यांध्येही तसेच पणशीकर हॉटेलपासून ते सुविधापर्यंतच्या प्रत्येक गाळ्यांमध्ये पुलाखालील विजेचे दिवे आणि पुलावरील दिवे यांच्या वीज जोडणीतून वीज चोरी करत याठिकाणी दिव्यांची व्यवस्था प्रत्येक फेरीवाल्यांना होत आहे. (Electricity Theft)

New Project 2024 06 19T140451.693

मुंबईतील रस्त्यांवर असलेल्या पथदिव्यांची उभारणी आणि देखभाल करण्याची जबाबदारी ही विद्युत पुरवठा करणारी कंपनी म्हणून शहरांमध्ये बेस्ट उपक्रम आणि उपनगरांमध्ये अदानी तसेच महावितरण कंपनी यांची आहे. सर्व विद्युत कंपन्या या महापालिकेसाठी काम करत असल्याने त्या पथदिव्यांच्या देखभालीसाठी येणारा खर्च हा महापालिकेच्या माध्यमातून संबंधित विद्युत पुरवठा कंपन्या तथा उपक्रमाला दिला जातो. त्यामुळे केशवसुत उड्डाणपूलावरील तसेच पुलाखाली पथ दिव्यांची व्यवस्था महापालिकेच्या निधीतून बेस्टच्या माध्यमातून पुरवली जाते. या पथदिव्यांच्या विद्युत भाराचा खर्च महापालिकेच्या माध्यमातून दिला जात असल्याने बेस्टचे विद्युत विभाग या स्ट्रीट लाईटमधून होणाऱ्या वीज चोरीकडे दुर्लक्ष करत असून याचा परिणाम आता रात्रीच्या वेळी लपून छपून केली जाणारी वीज चोरी (Electricity Theft) दिवसाढवळ्या लाईट लावण्यास मोठ्या हॅलोजन आणि पंख्यांचा वापर करण्यापर्यंत गेला आहे. (Electricity Theft)

New Project 2024 06 19T140249.895

(हेही वाचा – 800 वर्षांनंतर नालंदा विद्यापीठाचं वैभव परत आलं, Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन; नवीन कॅम्पसचं वैशिष्ट्य काय?)

दिवसाढवळ्या आणि उघड्या डोळ्यांनी ही वीज चोरी (Electricity Theft) दिसूनही बेस्टच्या विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच महापालिकेचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून वीज चोरीला प्रोत्साहन देत आहे. या वीज चोरीमुळे वीजेच्या वापरात वाढ होत असून याचे नुकसान बेस्ट उपक्रमाला होत आहे, पर्यायाने बेस्टचा विद्युत विभागातही आता तोट्यात जात आहे. एका बाजुला सामान्य ग्राहकाने एक महिना विलंबाने बिल भरल्यास त्यांची वीज जोडणी तोडून मीटर काढून नेण्याची हिंमत दाखवणाऱ्या बेस्ट महाव्यवस्थापकांनी आता हीच हिंमत दादरमधील फेरीवाल्यांकडून होणाऱ्या वीज चोरीच्या प्रकरणामध्ये दाखवतील का असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. दादरच्या केशवसूत उड्डाणपुलाखालील तसेच वरील पदपथ दिव्यांच्या जोडणीची पाहणी केली तरी वीज चोरीची पाळमुळे किती खोलवर गेली आहेत याची माहिती येईल. त्यामुळे महापालिका आयुक्त भुषण गगराणी आणि बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी जर हि हिंमत दाखवली तरच लोकांचा महापालिका आणि बेस्ट प्रशासनावरील विश्वास अढळ राहील, अन्यथा या फेरीवाल्यांच्या वीज चोरीला उपक्रमाची साथ आहे हे जनतेच्या मनात दृढ होईल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. (Electricity Theft)

New Project 2024 06 19T140357.880

वीज चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करा

बेस्ट आधीच तोट्यात आहे आणि त्यातच या फेरीवाल्यांकडून होणाऱ्या वीज चोरीमुळे (Electricity Theft) उपक्रमाचे नुकसान होत आहे. दिवसाढवळ्या खुले आम होणाऱ्या वीज चोरीकडे कानाडोळा का केला जातो. एकाबाजुला तोट्यात जाणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही. सामान्य माणसांनी बिल न भरल्यास त्यांना दंड आकारला जातो, मीटर कापून नेला जातो, तर मग या फेरीवाल्यांवर फुकटची मेहरबानी का? दीडशे मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांना बंदी आहे, त्यामुळे या फेरीवाल्यांना हटवून स्टेशन परिसर फेरीवालामुक्त महापालिकेने करावे आणि बेस्टने तातडीने सर्व पथदिव्यांतून जाणाऱ्या जोडणीची तपासणी करून तिथून पुन्हा चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी आणि चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक तथा कायदेशी कारवाई करावी. (Electricity Theft)

अक्षता तेंडुलकर, माहीम तालुका अध्यक्ष, भाजपा

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.