Operation Beti Bazar : राजस्थान, मध्य प्रदेशात मुलींची बोली लावून घृणास्पद व्यवहार, मुलींच्या सौदेबाजीचा मोठा खुलासा उघडकीस

पिपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टिज (पीयूसीएल) ने 'बेटी बाजार' ऑपरेशनची घेतली दखल

118
Operation Beti Bazar : राजस्थान, मध्य प्रदेशात मुलींची बोली लावून घृणास्पद व्यवहार, मुलींच्या सौदेबाजीचा मोठा खुलासा उघडकीस
Operation Beti Bazar : राजस्थान, मध्य प्रदेशात मुलींची बोली लावून घृणास्पद व्यवहार, मुलींच्या सौदेबाजीचा मोठा खुलासा उघडकीस

स्त्रियांना समाजात आदराचे, मानाचे स्थान देण्याची परंपरा असलेल्या आपल्या देशात कुटुंबियांकडूनच बोली लावून भर बाजारात मुली विकल्या जात असल्याची ह्रदयद्रावक घटना उघडकीस आल्या आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुलींच्या सौदेबाजीचा मोठा खुलासा समोर आला आहे. ‘बेटी बाजार’ (Operation Beti Bazar) या स्टिंग ऑपरेशनअंतर्गत कौटुंबिक नातेसंबंध बिघडवणाऱ्या या दुष्ट प्रथेचा पर्दाफाश  करण्यात आला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही भागांतून होत असलेल्या या घृणास्पद व्यवहारावर वाहिनीने स्टिंग केले आहे.

‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीचे पथक राजस्थानच्या गावांमध्ये पोहोचले. त्यांनी ‘बेटी बाजार’ या स्टींग ऑपरेशनअंतर्गत अल्पवयीन मुलींसंदर्भातील ही माहिती कॅमेऱ्यात चित्रीत केली आहे. राजस्थानच्या या गावांमध्ये मुलींसाठी बोली लावल्या जात आहेत. तेथे मुलींसाठी सौदेबाजी केली जाते. यासाठी बाजारात भरपूर मध्यस्थ असून त्यांच्यामार्फत हा व्यवसाय केला जातो. देशभरात एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जातो, तर दुसरीकडे मुलींची विक्री करण्याचा व्यापार बिनदिक्कतपणे सुरू आहे. बाजारात उघड्यावर त्यांच्यासाठी बोली लावली जाते. ‘आज तक’च्या तपास पथकाने मुलींची तस्करी आणि वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून याविषयीचे भयावह सत्य उघडे पाडले आहे.घ

राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील रामनगर गावात सर्वत्र गरिबी आहे. इथे लोकं फारच कमी रुपयांच्या मिळकतीकरिता आपल्या मुली विकतात. या गावातील मुलींच्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या लाखन नावाच्या मध्यस्थाने दिलेली माहिती अशी की, गावात किमान ५० ते ६० मुली आहेत. ज्यांना त्या विकत घ्यायच्या असतात त्यांना त्या दाखवल्या जातात. यामध्ये १४ ते १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलींचाही समावेश असतो. मुली विकण्याचा करार येथे अगदी सोप्या पद्धतीने मध्यस्थाद्वारे करून दिला जातो. या करारावर अन्नपुरवठा होतो. मुलींना हॉटेलमध्ये नाचण्यासाठी आणि गाण्यासाठी पाठवले जाते. मुलींचे पालकही आपल्या मुलींना विकण्याचा करार अगदी सहज करतात.

याविषयी मुलींची विक्री करण्याचा करार करणाऱ्या लाखन या मध्यस्थीने दिलेली माहिती अशी की, पोलिसांना शंका येऊ नये म्हणून कराराच्या कागदपत्रांवर मुलींना नाचण्या-गाण्यासाठी हॉटेलमध्ये पाठवण्यात येत आहे, असे लिहिले जाते, मुलीच्या पालकांना या कराराचे पैसे मिळतात. मुलींना विकण्याचा करार (अॅग्रीमेंट) पालकांमार्फतच करण्यात येतो.

मामाही घाणेरड्या खेळात सहभागी…
आई-वडिलांनंतर जवळच्या नातेवाइकांमध्ये सर्वात विश्वासार्ह नाते समजले जाणारे मामा हे देखील या घाणेरड्या खेळाचा भाग आहेत, उदाहरण पहा – राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील जयसिंगपुरा गावात एक मध्यमवयीन मामाच आपल्या अल्पवयीन भाचीची किंमत ७० लाख रुपये सांगतो आणि तिला विकायला तयार होतो.

भाऊ बहिणीचा सौदा करतो
मुली-बहिणींच्या सौदेबाजीचा हा बाजार केवळ राजस्थानपुरता मर्यादित नाही. मुलींची अशीच सौदेबाजी मध्य प्रदेशातही उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील बोरखेडी गावात एका व्यक्तीने आपल्याच 16 वर्षांच्या बहिणीसाठी सौदा करून एका महिन्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी केली. त्याचप्रमाणे बर्डिया गावात एका दलालाने आपल्याच कुटुंबातील मुलींची सौदेबाजी करताना १५ अल्पवयीन मुली आल्याचे सांगितले. मात्र सध्या केवळ पाचच करारासाठी तयार आहेत. रतलाम जिल्ह्यातील पिपलिया जोधा गावात एका महिलेने आपल्या भाचीला 2 लाख रुपयांना विकण्याचे मान्य केले.

लवकरात लवकर कठोर कारवाई होणे गरजेचे
बेटी पढाओ, बेटी बचाओ घोषणेच्या काळात स्वत:च्या मुली-बहिणींना घाणेरड्या बाजारात विकण्याच्या या आकडेवारीवरून त्याची व्याप्ती किती आहे, याचा अचूक अंदाज लावता येत नाही, परंतु कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या नातेवाईकांकडून होत असलेली ही मानवी तस्करी कौटुंबिक, सामाजिक आणि मानवी मूल्यांच्या खोल अधःपतनाचे निश्चितच सूचित करते. यावर लवकरात लवकर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मानवाधिकार संघटना पिपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टिज (पीयूसीएल) ने ‘बेटी बाजार’ ऑपरेशनची दखल घेऊन सरकारला पत्र लिहिणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.