Operation Brahma : भारताने 55 टन जीवनावश्यक साहित्य पाठवले म्यानमारला

75

Operation Brahma : शुक्रवारी म्यानमारमध्ये आलेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाला तोंड देण्यासाठी भारताने आपल्या शेजाऱ्याला मदतीचा हात पुढे केला आहे. म्यानमारच्या लोकांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे. ही माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (External Affairs Minister S. Jaishankar) यांनी दिली आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली. (Operation Brahma)

म्यानमारला मदत करण्यासाठी ‘ऑपरेशन ब्रह्मा’
ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत, भारताने त्यांच्या नेबरहूड फर्स्ट आणि अ‍ॅक्ट ईस्ट धोरणानुसार (Neighborhood First and Act East policies), तंबू, ब्लँकेट, स्लीपिंग बॅग्ज, फूड पॅकेट्स, हायजीन किट, जनरेटर आणि आवश्यक औषधे यासह १५ टन मदत साहित्याची पहिली खेप यंगूनला पोहोचवली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले: ऑपरेशन ब्रह्मा सुरू झाले आहे. भारताकडून मानवतावादी मदतीचा पहिला माल म्यानमारमधील यांगून विमानतळावर पोहोचला आहे. तसेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, भारतीय नौदलाची जहाजे आयएनएस सातपुरा आणि आयएनएस सावित्री ४० टन मानवीय मदत घेऊन यंगून बंदराकडे रवाना झाली आहेत. भारताने मदतीचा हात पुढे करत ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत म्यानमारमध्ये आलेल्या भयानक भूकंपानंतर ५५ टन मदत पोहोचवली आहे.

७.७ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे प्रचंड विनाश
म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप आणि शुक्रवारी रात्री उशिरा ४.२ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाल्यानंतर, शनिवारी बचाव कर्मचाऱ्यांनी त्यांचे शोध आणि मदत कार्य सुरू ठेवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, म्यानमारच्या एका लष्करी नेत्याने भूकंपात किमान ६९४ लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे, तर एका अमेरिकन एजन्सीने असा इशारा दिला आहे की मृतांची संख्या १०,००० पेक्षा जास्त असू शकते.

(हेही वाचा – औरंगजेबाच्या कबरीच्या वादात Dhirendra Krishna Shastri यांचे विधान; म्हणाले, औरंगजेबाने देश…)

ईशान्य भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले
शुक्रवारी रात्री उशिरा म्यानमारमध्ये (Myanmar Earthquake) ४.२ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला, असे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (National Seismological Center) वृत्त दिले आहे. आग्नेय आशियातील बहुतेक भागात ७.७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर काही तासांतच हा भूकंप झाला. मेघालय आणि मणिपूरसह भारतातील काही भागात तसेच बांगलादेशात, विशेषतः ढाका आणि चितगाव आणि चीनमध्येही जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच अधिकृत आकडेवारीनुसार, पहिल्या भूकंपापासून आतापर्यंत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.