मुख्य लिपिक पदाची २६ जून रोजी परीक्षा; नावे  नोंदवण्याची आजची अंतिम तारीख

मुंबई महापालिकेतील लिपिकांना मुख्य लिपिक बनण्याची संधी धावून आली आहे. ज्या लिपिकांचा पाच वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाला आहे आणि जे यापूर्वी याबाबतच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांची यादी बनवली जात असून यासाठी २६ जून रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेत सुमारे पावणे तीन हजार लिपिकांना परीक्षेला बसण्याची संधी मिळणार असून, यासाठी नावे देण्याची आजची अर्थात १५ जून २०२२ ही अंतिम तारीख आहे.
मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक (प्रमुख लेखापाल खाते) या पदांकरीता प्रश्नपत्रिकेच्या सुधारीत आराखडयानुसार, खात्यांतर्गत लेखी परीक्षा येत्या २६ जून २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची संधी देण्याकरता सर्व खाते व  विभाग प्रमुखांना इच्छुक व पात्र कर्मचा-यांनी त्यांची नावे  १५ जून २०२२ पर्यंत नोंद करून घ्यावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

अशी द्या माहिती

संबंधित मध्यवर्ती कार्यालयांनी एकत्रित यादी  १७ जून २०२२ पर्यंत पेनड्राईव्हवर व्यक्तीश: सामान्य प्रशासन विभागाच्या मराठी परीक्षा कक्षाकडे हार्ड कॉपीसह आणून द्यावी. ही माहिती MCGMUnicode या फॉन्ट (Font ) मध्ये मराठीत, Excel मध्ये दयावी, असे म्हटले आहे.

26 जून रोजी परीक्षा

कर्मचा-यांच्या पात्रतेबावत भविष्यात काही प्रकरणे उदभवल्यास संबंधित खाते तथा विभाग प्रमुख जबाबदार राहतील. सर्व खाते प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त यांनी हे परिपत्रक जे कर्मचारी रजेवर, प्रतिनियुक्तीवर गेले असतील किंवा ज्यांची विभाग / दुय्यम कार्यालयात बदली वा नेमणूक झाली असेल अशा सर्व संबंधित कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून द्यावे. ही परीक्षा २६ जून २०२२ रोजी आयोजित केली असल्याने, ही बाब तातडीची समजण्यात यावी. भविष्यात याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास त्याबद्दल संबंधित खाते प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त सर्वस्वी जबाबदार राहतील, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here