बुध, शुक्र, शनि, गुरू आणि मंगळ हे आपल्या ग्रहमालिकेतील महत्त्वाचे ५ ग्रह असून हे सध्या अवकाशात एकत्र दिसत आहेत. सोबतीला चंद्राचे सुद्धा दर्शन नागरिकांना घेता येईल यामुळे खगोल मंडळाने दुर्बिणीतून ग्रहदर्शन या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत नागरिकांना विनामूल्य अवकाशातील ग्रह पाहण्याची संधी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर येथे १ जानेवारीला सायंकाळी ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत मिळणार आहे.
( हेही वाचा ऋषभ पंत ठरला सर्वोत्तम कसोटीपटू! BCCI ने केले अभिनंदन)
अवकाशातील ग्रह कसे असतात, ग्रहांचे दर्शन कसे करायचे त्यांचे महत्त्व काय अशी विविध माहिती लोकांना देऊन जनजागृती घडावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती खगोल मंडळाच्या अभय देशपांडे यांनी दिली आहे. बुध आणि शुक्र हे दोन ग्रह जवळपास ६.३० च्या सुमारास त्यानंतर ९ वाजेपर्यंत शनिचे दर्शन होते. शनि मावळल्यानंतर गुरू आणखी अर्ध्या तासाने मावळतो. या ग्रहांचे दर्शन नागरिकांना दुर्बिणीतून घेता येणार आहे. विशेषत: शनि ग्रहाच्या सुंदर कड्या, गुरू ग्रहाचे ४ चंद्र दुर्बिणीतून सहज पाहता येतील. युरेनस आणि नेप्च्यून या ग्रहांचे मुंबईतून घेणे शक्य नाही असेही अभय देशपांडे यांनी सांगितले.
- प्रवेश – विनामूल्य
- वेळ – १ जानेवारी सायंकाळी ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत
- स्थळ – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर पश्चिम