Jarange Patil यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटी ग्रामस्थांचा विरोध

जरांगे यांनी 4 जूनपासून उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, 4 जूनला मनोज जरांगे उपोषणस्थळी जाऊन पुन्हा उपोषणाला बसतील.

367

लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार, ४ जून रोजी जाहीर होणार आहे, या निकालानंतर लागलीच जरांगे पाटील (Jarange Patil) उपोषणाला बसणार आहे. मात्र ज्या ठिकाणी जरांगे पाटील उपोषणाला बसतात त्या अंतरवाली सराटी येथे यावेळी ग्रामस्थांनीच विरोध केला आहे. यावेळी ग्रामस्थांनी जरांगे पाटलांना येथे उपोषणाला बसण्यासाठी पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे जरांगे पाटलांना उपोषणाचे ठिकाण बदलावे लागणार आहे.

ज्या गावातून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला, ज्या गावातून या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला, ज्या गावकऱ्यांच्या ताकदीमुळे मनोज जरांगे पाटील (Jarange Patil) यांच्या पाठिशी महाराष्ट्रातील मराठा समाज एकटवला, ज्या गावात मनोज जरांगे यांनी ऐतिहासिक सभा घेऊन राज्याचे लक्ष वेधले, ज्या गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते शरद पवारांपासून राज ठाकरेंपर्यंतचे दिग्गज पोहोचले. आता, त्याच अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनास विरोध केला आहे.

(हेही वाचा Legislative Council Elections 2024: भाजपाकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर; कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे, तर…)

जरांगे पाटील यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 

जरांगे यांनी 4 जूनपासून उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, 4 जूनला मनोज जरांगे (Jarange Patil) उपोषणस्थळी जाऊन पुन्हा उपोषणाला बसतील. तत्पूर्वीच, गावकऱ्यांनी जरांगेंच्या उपोषणाला विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले आहे. प्रशासनने या उपोषणास परवानगी देऊ नये, गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली आहे. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह 5 ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर 70 गावकऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे, जरांगे यांचे उपोषण वादात सापडल्याचे दिसून येत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.