कोरोना विषाणू साथीच्या तिसऱ्या लाटेची, डेल्टा विषाणूची शक्यता कायम असल्याने कोविड विषाणूचा तोंडावाटे प्रसार रोखणारे ‘कोव्हक्युअर’ नॅनो करक्युमिन ओरल स्प्रे चे संशोधन उपयुक्त असल्याची माहिती नॅनो सायंटिस्ट आणि ऑन्को क्युअर इंडिया प्रा लि चे संस्थापक डॉ विजय कनुरू यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. डॉ. कनुरु हे पुणे विद्यापिठाचे माजी विद्यार्थी असून अनेक परदेशी विद्यापीठात त्यांनी संशोधन केले आहे.
ही, पत्रकार परिषद पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झाली. यावेळी ‘नॅनो वेलनेस ‘ चे मुख्य कार्यकारी अधिकारी वेदांत पटवर्धन उपस्थित होते.
‘कोव्हक्युअर ‘ जगातील हा पहिला ओरल स्प्रे
डॉ. विजय कनुरु यांनी या नॅनो कर्क्युमिन स्प्रे संशोधनाची माहिती दिली. ‘कोव्हक्युअर ‘ जगातील हा पहिला नॅनो कर्क्युमिन ओरल स्प्रे असून त्यामुळे तोंडावाटे होणारा कोविड विषाणूचा प्रसार टाळता येणार आहे. विशेषत : शाळा, कार्यालय, विमानांमध्ये कोविड विषाणूची तिसरी लाट रोखण्यासाठी या ओरल स्प्रे संशोधनाचा उपयोग होणार आहे. डॉ कनुरू यांच्या नॅनो मेडिसिन रिसर्च अँड डेव्हलपमेंट कंपनी ची स्थापना २०१२ मध्ये झाली. त्यानंतर त्यांनी अनेक संशोधने केली. ‘कोव्हक्युअर ‘ हे नॅनो कर्क्युमिन ओरल स्प्रे संशोधन असून ते कामाच्या ठिकाणी विषाणू साथीचा प्रसार रोखण्यासाठी उपयोगी ठरू शकणार आहे . हळदीमधील कर्क्युमिन या औषधी पदार्थाचा उपयोग स्प्रे मध्ये केला आहे. त्याला एफडीएची मान्यता आहे. नॅशनल बायो फार्मा मिशन ( भारत सरकार )च्या बायोलॉजीक्स सेंटरने ते प्रमाणित केले आहे. तोंडावाटे बाहेर पडणारे तुषार ,ड्रॉप्लेट यामुळे कोविड-19 विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे तोंडाचे आरोग्य हा महत्त्वाचा विषय झाला आहे. कोविड झालेल्या रुग्णाची तोंडाची तसेच तोंडाच्या पोकळ्यांमध्ये फंगल इन्फेक्शन, बुरशीचा प्रादुर्भाव बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये ही आढळून आला आहे. म्युकरमायकॉसिस ,स्पोंडीलोटिस्क ची लक्षणे या रुग्णांमध्ये दिसलेली आहेत .
डॉ कनुरु यांचे स्पष्टीकरण
ओरल स्प्रे मधील बुरशीनाशक कर्क्युमिन मुळे कोविंड नंतरची गुंतागुंत टाळण्यास मदत होते. हे आधुनिक अँटी व्हायरल संशोधन नॅनो बायो टेक्नॉलॉजी च्या मदतीने केले असून ते परवडणारे, प्रभावी आणि सुटसुटीत आहे . वापरण्यास सोपे आहे . कर्क्युमिन मध्ये असलेल्या पॉलिफिनॉल मॉलिक्युल मुळे करोना प्रादुर्भाव रोखता येतो हे आता जगभर मान्य झाले आहे. कोविड-१९ (covid-19 ) दुसरी साथ आटोक्यात आली असे वाटताना देशात आणि परदेशात तोंडावाटे आणि नाकातील स्त्रावा मार्फत कोविड विषाणूंचा प्रसार होताना आढळत आहे. तोंडातील लाळ आणि तुषार यामुळे हा प्रसार वाढतो. कोविंड रोखण्यासाठी दिल्या जाणाऱ्या लस यांचा उपयोग मर्यादित असणार आहे. त्यामुळे शरीरात विशेषता तोंड आणि नाक यामध्ये विषाणू प्रसार रोखण्याची आवश्यकता आहे. कोव्ह क्युअर हे जगातील हे काम करणारे पहिले संशोधन आहे.
बालकांना अजून लस न मिळाल्याने त्यांच्यामध्ये कोविंड प्रसाराचा धोका अजून कायम आहे. अशा वेळी कोव्ह क्युअर उपयोगी पडणारे आहे. विमानात देखील ते नेता येणारे आहे. कोविड साथ जरी आटोक्यात आली तरी, सीजनल फ्लू प्रमाणे कोविड पृथ्वीतलावर शिल्लक राहणार आहे. त्यामुळे यासारख्या व्हायरल स्प्रे यापुढेही उपयोग होणार आहे ,असे डॉ कनुरु यांनी सांगितले.