अनंत चतुर्दशीला रायगड, रत्नागिरीला अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट

प्रातिनिधीक छायाचित्र

राज्यभरात वाऱ्यांचा प्रभाव वाढत असताना आता वरुणराजा गुरुवारपासून सक्रीय होत आहे. कर्नाटक राज्याच्या अंतर्गत आणि मध्य भागात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. येत्या 24 तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होत असल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी, अनंत चतुर्दर्शीच्या दिवशी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने जारी केला आहे.

( हेही वाचा : आयुक्तांचा झाला भुलभुलैय्या : बदल्या करा आणि मग रद्द करा यातच चहलांचा वेळ खर्ची)

गुरुवारपासून राज्यात पावासाचा जोर वाढेल. कोकणातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढलेला दिसून येईल. काही जिल्ह्यांना मुसळधार पावसासाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर आणि पुण्यात 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील. या जिल्ह्यात मुसळधार पाऊसही होईल. कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोलीत, नांदेडलाही हेच वातावरण राहील.

शुक्रवारपासून पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट, रायगड आणि सिंधुदुर्गसाठी अतिवृष्टीसाठी येलो अलर्ट तसेच रत्नागिरीत अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबईत शुक्रवारपासून सलग तीन दिवस मुसळधार पाऊस राहील. रत्नागिरीत शुक्रवारपासून सलग तीन दिवस अतिवृष्टीकरिता ऑरेंज अलर्ट राहील. रायगड जिल्ह्यात शनिवारी-रविवारी अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारपासून सलग तीन दिवस अतिवृष्टीसाठी यलो अलर्ट राहील. धुळ्यात, नाशिक, अहमदनगर मध्ये शनिवारी मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट राहील.

दोन्ही दिवस विकेंड गाजणार

  • पुणे, साताऱ्यात शनिवारी, कोल्हापुरात रविवारी अतिवृष्टीसाठी येलो अलर्ट राहील.
  • पुण्यात, साताऱ्यात रविवारी पावसाचा जोर कमी होत मुसळधार सरी कोसळतील. कोल्हापूरात रविवारी अतिवृष्टी होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here