Unseasonal rain : सततच्या अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना २९ एप्रिलला ऑरेंज अलर्ट (Unseasonal Rain) देण्यात आला आहे.

242
Unseasonal rain
Unseasonal rain : सततच्या अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट'

एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे संकट राहणार आहे. एकीकडे मे महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात नद्यांना पूर आला आहे. तर दुसरीकडे नांदेड येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

(हेही वाचा – Unseasonal Rain : मुंबईत पुढील दोन दिवस पावसाचा इशारा)

गेल्या आठवड्याभरापासून नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded) सतत अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे. विशेष म्हणजे फळपिके यांना सर्वाधिक फटका बसत आहे. अशात आता पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने बुधवार ३ मे रोजी जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे गुरुवार ४ मे रोजी देखील येलो अलर्ट कायम असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही पहा

या जिल्ह्यांना मिळाला ऑरेंज व यलो अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना २९ एप्रिलला ऑरेंज अलर्ट (Unseasonal Rain) देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, विदर्भ आणि छत्रपती संभाजी नगर वगळता सर्व जिल्ह्यांना पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ३० एप्रिलला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.