उन्हाळा आला की, सर्वांना ओढ लागते आंब्याची. तुम्ही सुद्धा आंब्याचे चाहते असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण कर्नाटक सरकारने आंब्याची ऑनलाईन विक्री सुरू केली असून यामार्फत तुम्ही आता थेट आंबे आपल्या घरी मागवू शकता. कर्नाटक सरकारच्या या उपक्रमामुळे ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
घरपोच आंबे
कर्नाटक सरकार, स्टेट मॅंगो डेव्हलमेंट अँड मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड यामार्फत इंडिया पोस्टच्या माध्यमातून ग्राहकाच्या घरापर्यंत आंबे पोहचवले जाणार आहेत असे कर्नाटकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आंब्याची विक्री करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून एक संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना आंबे खरेदी करता येणार आहेत.
( हेही वाचा : Bungee Jumping करण्यासाठी भारतातील टॉप ५ ठिकाणे… जाणून घ्या दर )
कर्नाटक सरकारने यापूर्वी सुद्धा कोरोना महामारीच्या काळात रामनगर, चिक्कबल्लापूर आणि कोलार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीने आंब्याची विक्री केली होती. खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर ग्राहकांना सर्व प्रकारचे आंबे उपलब्ध होणार आहेत.
आंबे ऑर्डर करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ – https://www.karsirimangoes.karnataka.gov.in/
Join Our WhatsApp Community