ऑमिक्रोन व्हेरिएंटची धास्ती, जालन्यात आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश

113

कोविड-19 च्या नव्या ओमायक्राॅन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याकरीता आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे. रुग्णालयांत बेडस, औषधं, व्हेटिंलेटर, ऑक्सिजन यांच्या उपलब्धतेबाबत आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करावे, अशी सूचना जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आरोग्य विभागाच्या प्रमुखांना केली. तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवण्याबरोबरच शहरी व ग्रामीण भागात कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असेही त्यांनी सांगितले.

आवश्यक वस्तूंची उपलब्धता तपासावी

कोविड-19 च्या नव्या ओमायक्राॅन व्हेरिएंटच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, कोविड-19 च्या नव्या ओमायक्राॅन व्हेरिएंटची जिल्हयात लागण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने आपली यंत्रणा सुसज्ज ठेवणे आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण रुग्णालयांत बेडस, औषधं, व्हेटिंलेटर, ऑक्सिजन हे पुरेसे प्रमाणात आहेत का, याबाबत खबरदारी घ्यावी. आवश्यक ती यंत्रसामुग्री चालू स्थितीत आहे का, हे तपासून पहावे. मनुष्यबळाची उपलब्धता, पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर, चाचण्यांच्या किट याबाबतही दक्षता घ्यावी.

 ( हेही वाचा :महाराष्ट्रातील ‘या’ दोन बँकांना ‘आरबीआय’चा दणका )

लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्या

कोविड प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवण्याची सूचना करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, लसीचा दुसरा डोस देण्यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे. घरोघरी जाऊन लसीकरण करावे. ज्या गावात तीनशे किंवा पाचशे जणांचे लसीकरण बाकी आहे, त्याठिकाणी विशेषत्वाने लसीकरण वेगाने करण्यावर भर दयावा. लसीपासून कुणीही वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांतील फायर ऑडीट, इलेक्ट्रीकल इन्सपेक्शन, स्ट्रकचरल ऑडिट यांचाही आढावा घेतला. रुग्णालयातील प्रलंबित इलेक्ट्रीकल आणि बांधकाम विषयक कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशी सूचना जिल्हाधिका-यांनी यावेळी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.