झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) या ऑनलाईन जेवणाच्या ऑर्डर पुरवणाऱ्या दिग्गज कंपन्यांनी त्यांचे चार्जेस वाढवले आहेत. या क्षेत्रात या दोन कंपन्यांची मक्तेदारी आहे. या दोन्ही कंपन्यांनी डिलिव्हरी चार्चेस तब्बल 20 टक्क्यांनी वाढवले आहेत. स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही कंपन्यांनी गेल्या वर्षापासून प्लॅटफॉर्म फी घेणे चालू केले आहे. ही फी अगोदर दोन रुपये होती. प्रत्येक ऑर्डवर घेतले जाणारे चार्जेस म्हणजेच प्लॅटफॉर्म फी आहे.
(हेही वाचा – विजेतेपदाचा चषक स्वीकारतानाची Messi आणि Rohit ची चाल चर्चेत)
प्रत्येक ऑर्डरसाठी सहा रुपये
स्वीगी आणि झोमॅटो या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून खाद्यपदार्थ ऑर्डर करणे आता महागणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी प्रत्येक ऑर्डरसाठीचे चार्जेस 20 टक्क्यांनी वाढवले आहेत. आता या दोन्ही कंपन्या प्रत्येक ऑर्डरसाठी सहा रुपये घेणार आहेत. याआधी प्रत्येक ऑर्डरसाठी या दोन्ही कंपन्या पाच रुपये घ्यायच्या. सध्या बंगळुरू, दिल्ली या ठिकाणी हा निर्णय लागू केला जाणार आहे.
का केली आहे शुल्कवाढ ?
स्विगी आणि झोमॅटोकडून नफावाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली आहे. जाहिरातीच्या माध्यमातूनही या कंपन्यांना काही प्रमाणात महसूल मिळतो. रेस्टॉरंट्सकडून मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्याची संधी या कंपन्यांना दिसत नाहीये. यामुळेच ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म फीमध्ये या कंपन्यांनी वाढ केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community