महामार्गांच्या दुरुस्तीला ‘वाट’ सापडली! ‘या’ तारखेपर्यंत खड्डे बुजवण्याचे निर्देश

राज्यातील अनेक महत्त्वाच्या महामार्गांवर असलेल्या खड्ड्यांच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे तर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या राज्यातील सर्व महामार्गांची येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे सांगत, हे सर्व खड्डे डांबरमिश्रीत खडीने भरण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभआगाचे अतिरिक्त आयुक्त मनोज सौनिक यांनी सोमवारी दिले आहेत.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मागील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने या खड्ड्यांच्या समस्येवरुन राज्य व केंद्र सरकारला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर सोमवारी हा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचाः ‘शिवसेना’ लय भारी, ‘खड्ड्यात’ गेली जबाबदारी! मुंबईकरांचे रोजचे हाल दाखवणारा व्हिडिओ)

१५ ऑक्टोबरपर्यंत दुरुस्तीचे निर्देश

कोकणासह राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून पावसाचा जोर असल्याने अनेक महत्त्वाच्या महामार्गांची अवस्था खड्ड्यांमुळे बिकट झाली आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मनोज सौनिक यांनी सोमवारी बैठक घेत राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीचे निर्देश दिले. मुंबई-गोवा व मुंबई-नाशिक या दोन महामार्गांसह राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करण्याचे व त्यावरील खड्डे 15 ऑक्टोबरपूर्वी बुजवण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले आहेत.

तातडीने कार्यवाही करण्याची गरज

तसेच रहदारीच्या आणि अती पर्जन्यमान असलेल्या महामार्गांवर पडणा-या खड्ड्यांची पावसाळ्यानंतर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे व महामार्गांच्या दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

(हेही वाचाः मुंबईतील ९२७ खड्डे बुजवायला ४८ कोटींची तरतूद का केली? ॲड. आशिष शेलारांचा सवाल)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here