नवी मुंबईत २५ वर्षांच्या मुलाकडून मृत्यूपश्चात अवयवदान झाले. हे मुंबईतील २६ वे अवयव दान होते. या अवयवदानातून पाच जणांना जीवनदान मिळाले. मुंबई विभागीय अवयवदान व प्रत्यारोपण समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाला वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र रुग्णालयात रुग्ण दाखल कोणत्या कारणास्तव झाला ही माहिती मुंबई विभागीय अवयवदान व प्रत्यारोपण समितीने दिली नाही. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी २५ वर्षाच्या तरुणाला मेंदू मृत घोषित केले. रुग्ण मेंदू मृत अवस्थेत गेल्यानंतर कालांतराने मृत ओढावतो. दरम्यानच्या काळात रुग्णाच्या शरीरातून अवयवदान करता येतात. डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबीयांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. समुपदेशनानंतर नातेवाईकांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
(हेही वाचा – जयंत पाटील-अमित शाह यांच्यातील कथित भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया)
रुग्णाच्या मृत्यूपश्चात कुटुंबीयांनी हृदय, यकृत, दोन मूत्रपिंड आणि डोळे असे सहा अवयव दान केले. अवयवदान मुंबई विभागीय अवयवदान व प्रत्यारोपण समितीच्या नियमानुसार केले गेले. गरजू रुग्णांना प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दिलेली माहिती नियमानुसार गुप्त ठेवली गेली. मुंबईकरांनी जास्तीत जास्त अवयवदान चळवळीत सहभाग घ्यावा असे आवाहन अवयवदान चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community