दीड वर्षाच्या मुलाने गमावले आईचे छत्र, मात्र तिने मरणानंतरही केले जीवनदान…

121

आपला नवरा आणि दीड वर्षाच्या मुलासह दुचाकीवरुन जात असताना ड्रेसवरची ओढणी चाकाखाली येत माधुरी ठाकरे या २२ वर्षीय मातेची आणि मुलाची कायमची ताटातूट झाली. या अपघातात बायको गमावल्यानेही पतीने मोठ्या धैर्याने पत्नीला मरणानंतरही जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या मृत्यूपश्चात त्यांनी तिची दोन्ही मूत्रपिंडे आणि यकृत दान करत तीन जणांना जीवनदान दिले.

( हेही वाचा : रविवारी बाहेर पडताय? जाणून घ्या कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक )

अवयवदानाला पाठिंबा

ही घडना भंडारा जिल्ह्यात राहणा-या ठाकरे दाम्पत्यांसोबत घडली. ७ मार्च रोजी तिघेही दुचाकीवरुन जात असताना हा अपघात घडला. माधुरी यांचे पती गणेश यांनी त्यांना तातडीने न्यू इरा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती ढासळत गेली. शेवटी डॉक्टरांनी माधुरी यांना मेंदू मृत घोषित केले. अशा स्थितीत रुग्णाची जगण्याची शक्यता नाही परंतु त्यांचे अवयव इतर गरजू रुग्णांना दान केल्यास त्यांना प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जीवनदान देता येते, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी तसेच अवयव समन्वयकांनी दिली. अखेर माधुरी यांचे पती अवयवदानासाठी तयार झाले. यावेळी माधुरी यांचा भाऊ आणि दीरही सोबत होता. अवयवदानाचे महत्त्व समजल्यानंतर त्यांनीही अवयवदानाला पाठिंबा दिला. हे नागपूर विभागातील यंदाच्या वर्षातील दुसरे अवयवदान ठरले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.